Menu Close

मेरठ (उत्तरप्रदेश) येथील प्रसिद्ध मौलाना कलीम सिद्दीकी यांना धर्मांतराच्या प्रकरणी अटक

हवाला पद्धतीने गोळा केलेल्या पैशांचा वापर धर्मांतरासाठी केल्याचा आरोप !

देशातील प्रत्येक मौलाना, मौलवी आणि इमाम यांच्यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे, अशी कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

मौलाना कलीम सिद्दीकी

मेरठ (उत्तरप्रदेश) – धर्मांतराच्या प्रकरणात उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने ६४ वर्षीय मौलाना (इस्लामी अभ्यासक) कलीम सिद्दीकी यांना अटक केली आहे. मौलाना कलीम सिद्दीकी हे ‘ग्लोबल पीस सेंटर’चे अध्यक्ष आहेत. तसेच ते ‘जमीयत-ए-वलीउल्लाह’ संघटनेचेही अध्यक्ष आहेत. या प्रकरणात यापूर्वी मुफ्ती काजी आणि उमर गौतम या दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही कलीम सिद्दीकी यांच्या संपर्कात होते. परदेशातून कलीम सिद्दीकी यांच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा झाल्याचा आरोप आहे. हवाला पद्धतीने गोळा केलेल्या या पैशांचा वापर सिद्दीकी यांच्याकडून धर्मांतरासाठी केला जात होता.

१. मौलाना सिद्दीकी अन्य धर्मियांना आमीष दाखवून धर्मांतरासाठी प्रयत्न करत होते. ते इतर मदरशांनाही आर्थिक साहाय्य देत होते. परदेशातून हवाला पद्धतीने या कामासाठी पैसा गोळा केला जात होता. बहरीनमधून सिद्दीकी यांच्या खात्यात जवळपास दीड कोटी रुपये आले होते. त्यांच्या खात्यात परदेशातून एकूण ३ कोटी रुपये आले होते.

२. ७ सप्टेंबर या दिवशी मुंबईत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याद्वारे आयोजित ‘राष्ट्र प्रथम आणि राष्ट्र सर्वोतोपरि’ या कार्यक्रमात मौलाना सिद्दीकी सहभागी झाले होते. यापूर्वी अभिनेत्री सना खान हिचा ‘निकाह’ लावल्यामुळे मौलाना सिद्दीकी चर्चेत आले होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *