Menu Close

दरांग (आसाम) येथे अतिक्रमणावरील कारवाईच्या वेळी सहस्रो सशस्त्र धर्मांधांकडून पोलिसांवर आक्रमण

धर्मांधांकडून सरकारी भूमीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण

पोलिसांच्या गोळीबारात २ धर्मांध ठार, तर ९ पोलीस घायाळ

सरकारी भूमीवर अतिक्रमण करून वर तिच्या बचावासाठी धर्मांधांकडून पोलिसांवर होणारे सशस्र आक्रमण, हे एक छोटे युद्धच आहे, हे लक्षात घ्या ! धर्मांध अशा प्रकारे संघटित असल्याने जेथे ते पोलीस आणि प्रशासन यांना भारी पडत असतील, तेथे हिंदूंची काय स्थिती होईल ? – संपादक दैनिक सनातन प्रभात

देशात कुठेही धर्मांधांना घर नाकारले गेल्यास गळे काढणारे पुरो(अधो)गामी, साम्यवादी, काँग्रेसी आदी आता धर्मांधांनी सरकारी भूमीवर केलेल्या अतिक्रमणाविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

घायाळ पोलीस

दरांग (आसाम) – दरांग जिल्ह्यातील धौलपूर येथे अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी गेलेले अतिक्रमणविरोधी पथक आणि पोलीस यांच्यावर सहस्रो धर्मांध आंदोलनकर्त्यांनी आक्रमण केले. या वेळी पोलिसांनी संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात सद्दाम हुसेन आणि शेख फरीद यांचा मृत्यू झाला. या हिंसाचारामध्ये ९ पोलीस घायाळ झाले. यांतील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस उपनिरीक्षक मोनिरुद्दीन हे गंभीररित्या घायाळ झाले आहेत. आक्रमण करणार्‍यांपैकी अनेक जण सशस्त्र होते. अतिक्रमणामुळे बेघर झालेल्या ८०० कुटुंबांनी त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आंदोलन चालू केले होते. तेव्हा आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक चालू केली. त्या वेळी पोलिसांनी गोळीबार केला.

पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

या घटनेविषयी राज्याचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा म्हणाले की, पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. यात दोघांचा मृत्यू झाला, तर एक पोलीस अधिकारी गंभीररित्या घायाळ झाला.

अतिक्रमण हटवण्याचे काम चालू राहील ! – पोलीस अधीक्षक

दरांगचे पोलीस अधीक्षक सुशांत बिस्व सरमा यांनी सांगितले की, सशस्त्र आंदोलनकर्त्यांनी धारदार शस्त्रे आणि दगड यांद्वारे पोलिसांवर आक्रमण केले. त्यामुळेच पोलिसांना स्वसंरक्षणार्थ गोळीबार करावा लागला. ही घटना घडली असली, तरी अतिक्रमण हटवण्याचे काम चालूच राहील. आतापर्यंत ६०२ हेक्टर (अनुमाने १ सहस्र ४८७ एकर) भूमीवरील अतिक्रमणे हटवून भूमी मोकळी करण्यात आली आहे.

राहुल गांधी यांच्याकडून टीका

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी

या घटनेविषयी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, जाणूनबुजून घडवलेल्या घटनेमध्ये आसाम सध्या होरपळत आहे. मी आसाममधील बंधू-भगिनींच्या पाठीशी आहे. (अतिक्रमण करणार्‍या धर्मांधांच्या पाठीशी असणारी काँग्रेस आणि गांधी परिवार यांच्यामुळेच आज देशात धर्मांधांची अतिक्रमणे झाली अन् वाढली आहेत ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

३० सहस्र एकर भूमीवर अतिक्रमण

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील ३० सहस्र एकर भूमीवर अतिक्रमण झाले आहे. (इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होईपर्यंत आतापर्यंतचे शासनकर्ते आणि पोलीस झोपले होते का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात) येथे ५ सहस्र वर्षांपूर्वीचे प्राचीन शिवमंदिर आणि गुफा आहे. अतिक्रमण करणारे बहुसंख्य धर्मांध आहेत. सरकारने प्रशासनाला ही भूमी अतिक्रमणमुक्त करण्याचा आदेश दिल्यावर येथे कारवाई करण्यात आली. ‘सरकारने अतिक्रमण हटवतांना पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते’, असे धर्मांधांचे म्हणणे आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *