Menu Close

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली सर्वाेच्च न्यायालयाचे अतिरिक्त महाधिवक्ता एन्. व्यंकटरमण् यांची सदिच्छा भेट !

देहली येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियाना’ला प्रारंभ

धर्मसंस्थापनेसाठी कार्य करणार्‍यांना त्रास सहन करावा लागतो ! – एन्. व्यंकटरमण्, अतिरिक्त महाधिवक्ता, सर्वाेच्च न्यायालय, देहली

सर्वाेच्च न्यायालयाचे अतिरिक्त महाधिवक्ता एन्. व्यंकटरमण् (डावीकडे)यांना ग्रंथ भेट देतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

देहली – हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी समितीच्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियाना’ला प्रारंभ करतांना सर्वाेच्च न्यायालयाचे अतिरिक्त महाधिवक्ता एन्. व्यंकटरमण् यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांच्याशी अध्यात्म आणि धर्म, तसेच सनातन संस्थेचे धर्मकार्य यांविषयी विस्तृत चर्चा झाली. या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी येणार्‍या भीषण आपत्काळाविषयी २२ वर्षांपूर्वी केलेल्या कथनाविषयी महाधिवक्ता व्यंकटरमण् यांना माहिती देण्यात आली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आपले कार्य अतिशय चांगले आहे. काळानुरूप त्याची आवश्यकता आहे. संत आधीच सर्व सांगून ठेवतात. जे धर्म आणि धर्मसंस्थापना यांसाठी कार्य करतात, त्यांना कष्ट सहन करावेच लागतात. प्रभु श्रीरामांनाही वनवास झाला, पांडवांनाही दु:ख भोगावे लागले, तरीही त्यांनी धर्मसंस्थापनेचे कार्य पूर्ण केले.’’

याप्रसंगी समितीचे राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया, समितीचे पश्चिम उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड समन्वयक श्री. श्रीराम लुकतुके आणि सनातन संस्थेच्या देहली राज्य प्रवक्त्या कु. कृतिका खत्री उपस्थित होत्या. या प्रसंगी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या मंगलहस्ते महाधिवक्ता एन्. व्यंकटरमण् यांना सनातनचा ‘स्पिरिच्युॲलिटी इज सुपिरिअर टू मॉडर्न सायन्स’ (अध्यात्म हे आधुनिक विज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे !) हा इंग्रजी ग्रंथ भेट देण्यात आला.

क्षणचित्र : धर्मप्रसारामध्ये युवा साधकांचा पूर्णकालीन सहभाग पाहून महाधिवक्ता व्यंकटरमण् यांना अतिशय आनंद झाला.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *