Menu Close

मालवा (मध्यप्रदेश) येथे हिंदु नोकराचे बलपूर्वक धर्मांतर आणि सुंता करणारा धर्मांध डॉक्टर अन् त्याचा मुलगा यांच्यावर गुन्हा नोंद

मालवा भारतात आहे कि पाकिस्तानमध्ये ? मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते ! धर्मांधांमध्ये सरकारचा धाक निर्माण होणे आवश्यक ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

धर्मांध कितीही शिकले, तरी ते त्यांच्या धर्मानुसार कट्टरतावादीच रहातात आणि हिंदूंवर आक्रमण करतात, तर हिंदू अधिक शिकल्यावर अधिक पुरो(अधो)गामी आणि नास्तिक बनतात अन् जगाला तसे दाखवतात ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

मालवा (मध्यप्रदेश) – येथील डॉ. नासीर खान आणि त्याचा मुलगा जुबेर खान यांनी त्यांचा नोकर दशरथ याचे बलपूर्वक धर्मांतर करून त्याची सुंता केल्याची घटना घडली. या प्रकरणी धर्मांतरविरोधी कायद्यांच्या अंतर्गत पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डॉ. नासीर आणि जुबेर यांनी दशरथ याला तो मंदिरात गेल्यामुळे मारहाण केली आणि बलपूर्वक नमाजपठणही करायला लावले. वर्ष २००७ पासून दशरथ येथे कामाला आहे. ‘ते दोघे जण ‘तुला अनेक वर्षांपासून पोसले असल्याने तुला इस्लाम स्वीकारावा लागेल’, असे म्हणत माझ्यावर दबाव आणून मला मारहाण करत होते’, असे दशरथ याने तक्रारीत म्हटले आहे. मध्यप्रदेश सरकारच्या नव्या धर्मांतरविरोधी कायद्यानुसार दोषीला अधिकाधिक १० वर्षांचा कारावास आणि १ लाख रुपये दंड, अशी शिक्षा होऊ शकते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *