सौदी अरेबियातील मदिना हे मुसलमानांच्या दृष्टीने पवित्र क्षेत्र मानले जाते. तेथे मनोरंजनाची साधने असू नयेत, अशी मुसलमानांची मागणी आहे. तसे पहाता चित्रपट हे इस्लामच्या दृष्टीने ‘हराम’ (निषिद्ध) आहे. तरीही मुसलमान अभिनेते-अभिनेत्री ‘बॉलीवूड’मध्ये काम करत असतात. त्यांचा निषेध करायला भारतातील किती मुसलमान पुढे येतात ? ‘बॉलीवूड’मधील खान मंडळी वारंवार चित्रपटांतून हिंदु देवतांचा अवमान करत असतात. जर त्यांना त्यांच्या धर्मातील पवित्र ठिकाणी चित्रपटगृहे नकोत, तर त्यांच्याच धर्मातील आणि निषिद्ध मानल्या गेलेल्या चित्रपटांतून खान मंडळींचे काम कसे काय चालते ? अर्थात् यातून मुसलमानांचा कावेबाजपणा आणि असहिष्णुता उघड होतेच; पण त्याहून अधिक हिंदूंचा निद्रिस्तपणा ठळक आहे. चित्रपट-विज्ञापनांद्वारे हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे केले जाणारे विडंबन, सरकारीकरणाच्या माध्यमातून होणारी मंदिरांची लूट, मंदिरांतील मूर्तींची तोडफोड यांसारख्या घटना भारतात घडूनही देशातील हिंदू त्याचा साधा निषेध करायलाही पुढे येत नाहीत. बहुसंख्य हिंदू असलेल्या भारताची हीच शोकांतिका आहे. हिंदू संघटित नसल्याने राजकीय स्तरावरही त्याची नोंद होत नाही. मुसलमानांचे स्वधर्माविषयीचे प्रेम शिकून भारतातील हिंदूंनीही स्वधर्माभिमान वृद्धींगत करायला हवा. असे झाले, तरच हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा नेहमी सन्मानच होईल; पण सन्मान होण्यासाठी हिंदूंनी भाग पाडले पाहिजे !
– कु. प्राजक्ता धोतमल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात