Menu Close

देहलीमध्ये विनोद नावाच्या हिंदूचे तो नववीत शिकत असतांना बलपूर्वक धर्मांतर केल्याचे उघड !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथून ‘ग्लोबल पीस सेंटर’चे अध्यक्ष मौलाना (इस्लामी अभ्यासक) कलीम सिद्दीकी यांना अटक केल्याचे प्रकरण 

बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात अल्पसंख्यांक हे हिंदूंचे धर्मांतर करतात, तर हिंदू अल्पसंख्यांक असलेल्या पाकिस्तान, बांगलादेश यांसारख्या धर्मांधबहुल देशांतही हिंदूंचाच वंशविच्छेद होत आहे. या परिस्थितीवर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच पर्याय आहे, हे जाणा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात 

मौलाना कलीम सिद्दीकी
फरिदाबाद (हरियाणा) – इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर केल्याप्रकरणी विनोद नावाच्या व्यक्तीने मौलाना सिद्दीकी आणि त्यांचे ५ सहकारी यांच्या विरोधात येथील सेक्टर-५ च्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणी प्रथमदर्शनी माहिती अहवाल नोंदवण्यात आला असून पुढील अन्वेषण करण्यात येत आहे. विनोदचे धर्मांतर झाले, तेव्हा तो नववीत शिकत होता.

१. धर्मांतरप्रकरणी उत्तरप्रदेश आतंकवाद विरोधी पथकाने २१ सप्टेंबर या दिवशी मौलाना कलीम सिद्दीकी यांना अटक केली होती. त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आतंकवाद विरोधी पथकाच्या माहितीप्रमाणे मौलाना सिद्दीकी हे मदरसे, तसेच सामाजिक आणि धार्मिक संस्था यांच्या माध्यमांतून देशभर धर्मांतराचे रॅकेट (जाळे) चालवत होते. यासाठी त्यांना हवालामार्गे आर्थिक साहाय्यही मिळत होते. यातूनच सिद्दीकी यांनी विनोदचेही धर्मांतर केले.

२. विनोदने दिलेल्या माहितीप्रमाणे, तो फरिदाबाद येथील सेक्टर-१७ च्या प्रेमनगरमधील झोपडपट्टीमध्ये रहात होता. त्याच्या शेजारी काही धर्मांध रहात होते. ते नेहमी इस्लामचे उदात्तीकरण करायचे आणि हिंदु धर्मावर टीका करायचे.

३. एका वृत्ताप्रमाणे जेव्हा विनोदचे धर्मांतर झाले, तेव्हा म्हणजे वर्ष २०१४-१५ मध्ये तो नववीमध्ये शिकत होता. शाळेतून येता-जाता गॅस शेगडी आणि शिलाई यंत्र यांच्या दुरुस्तीचे काम करणारा शहजाद त्याला जवळ बोलवायचा अन् त्याला खाण्या-पिण्याचे पदार्थ द्यायचा. त्या वेळी तो विनोदशी इस्लामची चर्चा करायचा. शहजाद म्हणायचा की, ‘तू मुसलमान बनलास, तर नरकात जाण्यापासून वाचशील.’

४. एक दिवस त्याला देहलीच्या शाहीनबागमधील एका मशिदीमध्ये नेण्यात आले आणि तेथे त्याची मौलाना सिद्दीकी यांच्याशी भेट करून देण्यात आली. त्यानंतर मौलाना यांनी त्याची गळाभेट घेऊन त्याचे धर्मांतर केले आणि ‘नूर महंमद’ असे नाव ठेवले. त्यानंतर त्याला इस्लामच्या शिक्षणासाठी गुजरात आणि उत्तरप्रदेश येथे पाठवण्यात आले.

५. विनोदने सांगितले की, आरोपींच्या तावडीतून सुटून त्याने गुप्तपणे फरिदाबादमध्येच २ वर्षे काढली. वर्ष २०२० मध्ये जेव्हा त्याला त्याच्या बहिणीच्या विवाहाविषयी समजले, तेव्हा तो त्याच्या कुटुंबाला भेटायला गेला.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *