व्हिडिओची चौकशी करण्यात येणार
|
‘पूरी दुनिया में अल्लाह की निजामियत कायम करनी है’: IAS इफ्तिखारुद्दीन पर धर्मांतरण को बढ़ावा देने के आरोप, 3 वीडियो वायरल#Kanpur #IAShttps://t.co/rzmCXjUkrs
— ऑपइंडिया (@OpIndia_in) September 28, 2021
१. यासंदर्भात कानपूरचे पोलीस आयुक्त असीम अरुण यांनी अतिरिक्त उपायुक्त सोमेंद्र मीणा यांना या प्रकरणाच्या चौकशीचा आदेश दिला आहे.
२. ‘हा व्हिडीओ खरा आहे का आणि त्यामध्ये काही गुन्हा घडला आहे का ? याची चाचपणी केली जात आहे’, अशी माहिती कानपूर नगर पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे. (हिंदुविरोधी प्रचार आणि धर्मांतर यांविषयी सरकारी निवासस्थानी चर्चा होणे, हा गुन्हा नव्हे का ? याविषयी १-२ दिवसांत चौकशी होऊन कार्यवाही होणे आवश्यक ! – संपादक दैनिक सनातन प्रभात )
३. मठ मंदिर सहकारी समितीचे उपाध्यक्ष भूपेश अवस्थी यांनी इफ्तखारूद्दीन यांच्यावर हिंदुविरोधी कारवाया करण्याचा आरोप केला आहे.
हिंदु धर्माविषयी अपप्रचार करणारी गोष्ट सांगणारे इफ्तखारूद्दीन !
या व्हिडिओमध्ये इफ्तखारूद्दीन म्हणतात की, पंजाबमध्ये एका व्यक्तीने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. याविषयी त्याला कारण विचारले असता तो म्हणाला, ‘‘माझ्या बहिणीच्या मृत्यूनंतर तिला जाळण्यात आले. तेव्हा तिचे कपडे जळाले आणि ती निर्वस्त्र झाली. तेथे उपस्थित सर्वजण ते पहात होते. याची मला लाज वाटली. आज माझ्या बहिणीला पहात आहेत, उद्या मुलीला पहातील. यामुळे मी इस्लाम स्वीकारण्याचा निर्णय घेतला. कारण याहून चांगला धर्म कोणताच नाही.’’ (हिंदूंच्या अंत्यसंस्काराविषयी अशा प्रकारची खोटी कथा सांगून अपप्रचार करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी इफ्तखारूद्दीन यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे ! तसेच केंद्र सरकारने त्यांना नोकरीतून बडतर्फ केले पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात )