लेखापरीक्षक राधाकृष्णन् यांच्यावरील आक्रमणाचे प्रकरण
शंकराचार्यांना अटक झाल्यावर त्यांची अपकीर्ती करणारी वृत्ते प्रसारित करणारी प्रसारमाध्यमे त्यांना निर्दोष ठरवल्यावर मात्र वृत्त प्रसारित करत नाहीत, हे लक्षात घ्या आणि अशा हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांवर बहिष्कार घाला !
चेन्नई : सप्टेंबर २००२ मध्ये लेखापरीक्षक राधाकृष्णन् यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती आणि अन्य ८ जणांना न्यायालयाने दोषमुक्त केले. (निरपराध्यांना नाहक १५ वर्षे मनस्ताप भोगण्यास भाग पाडणार्या अन्वेषण यंत्रणा आणि न्याययंत्रणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
प्रथमवर्ग अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. राजामणिकम् यांनी आदेशात म्हटले आहे की, शंकराचार्यांसह सर्व आरोपींना दोषमुक्त करण्यात येत आहे. खोटी साक्ष दिल्याविषयी साक्षीदार रवि सुब्रह्मण्यम् याच्यावर वेगळा खटला चालवण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. (खोटी साक्ष देऊन हिंदूंच्या धर्मगुरूंना गोवण्याचा प्रयत्न करणार्यांचा बोलवता धनी कोण आहे, ते शासनाने शोधून जनतेसमोर आणावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
फिर्यादी पक्षाने म्हटले होते की, आरोपींनी कट रचून कांची कामकोटी पिठाचे माजी लेखापरीक्षक एस्. राधाकृष्णन् यांच्या घरावर २० सप्टेंबर २००२ या दिवशी आक्रमण केले होते. मठातील गैरव्यवहार समोर आणण्यासाठी राधाकृष्णन् हे सोमशेखर गणपाडिगाल यांच्या टोपणनावाने पत्र लिहीत होते. त्या विरोधात आरोपींनी एस्. राधाकृष्णन् यांच्या हत्येचे षड्यंत्र रचले. शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी अशा प्रकारच्या पत्रांविषयी स्वरूपात अप्रसन्नता व्यक्त केली होती. याशिवाय शंकराचार्यांनी युदारेसा अय्यर आणि रघू यांना याविषयी कारवाई करण्यास सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी शंकराचार्यांसह १२ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता. (शंकराचार्यांना खोट्या प्रकरणात गोवून त्यांचा छळ करणार्यांना अटक करावी, तसेच कारागृहात डांबावे, अशी मागणी आता समस्त हिंदूंनी तमिळनाडू शासनाकडे केली पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) एस्. राधाकृष्णन् यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी संशयित आरोपींवर वर्ष २००६ मध्ये पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात