गुजरात दंगलीवरून हिंदूंना तालिबानी ठरवणारे ढोंगी निधर्मीवादी तोंड उघडतील का ?
हजारीबाग (झारखंड) जवळील केरेदारी येथे श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात २ हिंदूंसह तिघांची हत्या करण्यात आली, तर काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली.
१. श्रीरामनवमीच्या दिवशी म्हणजेच १५ एप्रिल या दिवशी धर्मांधांनी आक्रमण करत दगडफेक केली. या आक्रमणात एका हिंदूची हत्या करण्यात आली. काही घरे, वाहने आणि दुकानांमध्ये जाळपोळ करण्यात आली.
२. दुसर्या घटनेत हजारीबाग येथे १६ एप्रिल या दिवशी काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या वेळी दोन गटांमध्ये दंगल झाली. या वेळीही धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. प्रिंस सिंह आणि अनुज कुमार सिन्हा या हिंदूंची हत्याही करण्यात आली.
३. तिसर्या घटनेत हजारीबाग येथेच १७ एप्रिल या दिवशी श्रीरामनवमीच्या शोभायात्रेवर धर्मांधांनी दगडफेक केली. त्या वेळी दुकाने आणि वाहने यांना आग लावली. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. त्यामुळे काही पोलिसांसहित बारा जण घायाळ झाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात