Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या ‘ऑनलाईन’ श्री गणेशदर्शन सोहळ्याला धर्मप्रेमींचा उदंड प्रतिसाद !

‘हिंदु राष्ट्राची स्थापना शीघ्रतेने व्हावी’, यासाठी ‘ऑनलाईन श्री गणेशदर्शन सोहळ्या’च्या माध्यमातून धर्मप्रेमींचे श्री गणेशाला साकडे !

मुंबई – सध्या कोरोना महामारीमुळे एकमेकांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन श्री गणेशमूर्तीचे दर्शन घेणे, सामूहिक आरतीसाठी उपस्थित रहाणे यांवर मोठ्या प्रमाणात मर्यादा आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्यभरातील धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ श्री गणेशदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षण या उपक्रमात सहभागी असणार्‍यांनी ‘ऑनलाईन’ प्रणालीच्या माध्यमातून एकमेकांकडील श्री गणेशमूर्तीचे दर्शन घेतले, तसेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने सामूहिक आरती आणि एकत्रित नामजप करण्यात आला. आरतीच्या शेवटी सर्वांनी ‘हिंदु राष्ट्र शीघ्रतेने स्थापन व्हावे’, यासाठी श्री गणेशाच्या चरणी सामूहिक प्रार्थना केली. या वेळी घोषणाही देण्यात आल्या. आरती आणि घोषणा यांमुळे उपस्थितांनी भरभरून आनंद आणि उत्साह अनुभवला. महाराष्ट्र, गोवा येथील विविध जिल्ह्यांतील शेकडो धर्मप्रेमींनी ‘ऑनलाईन’ श्री गणेशदर्शनाचा लाभ घेतला.

सोहळ्यातील विशेष घडामोडी

१. सातारा येथील कु. अंजली कुंभार, आळंदी (जिल्हा पुणे) येथील सौ. रश्मी विखार यांनी इतर धर्मप्रेमींच्या घरी ‘ऑनलाईन’ दर्शनाचे पुढाकार घेऊन नियोजन केले. सर्वजण सहकुटुंब आरतीला उपस्थित राहिले होते.

२. श्री. अंकुश माने या धर्मप्रेमीने या सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला. सोहळा झाल्यावर त्यांच्या ४ मित्रांना सनातन संस्थेचे ‘गणेश पूजा आणि आरती’ हे ‘ॲप डाऊनलोड’ करून दिले.

३. रत्नागिरी येथील कु. मृदुला देसाई यांनी श्री गणेशमूर्तीच्या भोवती सजावट करतांना धर्मशिक्षण देणारे फ्लेक्स (फलक) लावले होते. त्यामुळे ‘ऑनलाईन’ दर्शन घेणार्‍यांना या फलकांच्या माध्यमातून धर्मशास्त्राविषयी माहिती मिळाली.

सोहळ्यासंदर्भात आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव

जळगाव

जळगाव येथील कु. पायल नेवे, कु. तेजल नेवे, सौ. माधुरी महाजन, सौ. अनिता जाधव, सौ. स्वाती जाधव यांनी ‘तुम्ही सर्वजण आमच्या घरी आला आहात, असे वाटले. ही संकल्पना आवडली आणि उत्साह वाढला’, असे सांगितले.

नाशिक

हेमा दिवाकर – सात्त्विक वेशभूषा करून आरतीची सिद्धता केली होती. एकाच वेळी अनेक ठिकाणच्या श्री गणेशमूर्तींचे दर्शन आणि आरती असे वेगळेच दृश्य होते. जेव्हा या सोहळ्याचा निरोप आणि प्रसाराची ‘पोस्ट’ मिळाली, तेव्हापासूनच उत्साह जाणवत होता.

मुंबई

१. श्री. आशिष पाटील – नवरात्रीतही याचप्रकारे उपक्रम ठेवा. यामुळे एक कुटुंब असल्यासारखे वाटत होते.

२. सौ. ज्योत्स्ना भिरुड – घरी श्री गणेशमूर्तीची स्थापना करू शकले नाही; मात्र ‘ऑनलाईन’ दर्शनामुळे पुष्कळ आनंद मिळाला. ‘देवच सर्व काळजी घेत आहे’, असे वाटले.

३. सौ. ज्योती देशमुख – ‘गणेश पूजा आणि आरती’ या ‘ॲप’मधील आरती ऐकत घरात आरती केल्यावर पुष्कळ चैतन्य जाणवत होते.

पुणे

१. कु. प्राची शिंत्रे – या उपक्रमामुळे स्वरक्षण प्रशिक्षण शिकवणारे जिल्ह्यातील प्रशिक्षक आणि धर्मप्रेमी यांच्यात जवळीकता निर्माण झाली.

२. सौ. भाग्यश्री वाणी – आरतीमधून पुष्कळ चैतन्य जाणवले. अशी आरती आम्ही पहिल्यांदाच केली.

३. श्री. उद्धव तोडकर – घरातील सर्वांच्या तोंडवळ्यावर एक वेगळेच समाधान आणि आनंद दिसत होता. सामूहिक नामजप केल्यामुळे आम्हाला घरात पुष्कळ चांगले जाणवले.

४. कु. राधिका ठोंबरे – घरगुती अडचणीमुळे श्री गणेशमूर्तीची स्थापना करू शकले नाही; मात्र ‘ऑनलाईन’ दर्शनामुळे सर्वांच्या घरातील गणपतीचे दर्शन झाले आणि चैतन्य अनुभवायला मिळाले.

सातारा

१. सौ. अंजली देशपांडे – श्री गणेशदर्शन सोहळ्यामुळे ‘आपण सर्व एकत्र जमलो आहोत’, असे वाटले.

२. सौ. अर्चना हवले – श्री गणेशदर्शन सोहळा चालू होण्याच्या अगोदर वीज नव्हती. काही काळाने वीज आल्यामुळे दर्शन घेता येऊन देवाची कृपा अनुभवता आली.

कोल्हापूर

१. श्री. निखील कांबळे – सामूहिक आरती, नामजप करतांना पुष्कळ छान वाटले.

२. कोल्हापूर जिल्ह्यातील काही युवतींनी ‘घरातील आरतीच्या वेळी असे वेगळेपण अनुभवता येत नाही. ते सामूहिक आरतीच्या माध्यमातून अनुभवता आले’, असा अभिप्राय दिला.

सिंधुदुर्ग

१. कु. अक्षता मोरे – गेल्या २ वर्षांपासून श्री गणेशाचे दर्शन घेण्यात पुष्कळ अडचणी आल्या; पण या वेळी देवाच्या कृपेने ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून सर्वजण एकत्र भेटलो.

२. कु. राखी पांगम – आपण स्वतःसाठी देवाकडे काहीतरी मागतच असतो; पण या वेळी सर्वांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना केल्यामुळे आनंद झाला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *