Menu Close

हिंदु मुलींना फसवण्यासाठी मुसलमान मुलांना चिथवणार्‍या नेपाळी मौलानाला (इस्लामी विद्वानाला) अटक !

गाझीपूर (उत्तरप्रदेश) – हिंदु मुलींना फसवण्यासाठी मुसलमान मुलांना चिथावणी देणार्‍या मौलाना (इस्लामी विद्वान) फिरोज आलम याला फतेहपूर पोलिसांनी अटक केली. तो मुसलमान मुलांना, ‘दुसर्‍यांच्या (हिंदूंच्या) मुलींना फसवून आणा. त्यामुळे तुम्हाला पैसे मिळतील आणि मजाही करता येईल’, असे सांगायचा. तो नेपाळचा असून २० वर्षांपासून अवैधपणे भारतात रहात होता. त्याच्या विरुद्ध मशिदीच्या सदस्यांनी स्वत:हून पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याच्या विरोधात मुसलमान मुलांना भडकावणे आणि हिंदु मुलींचे धर्मांतर करणे, असे आरोप आहेत.

१. अप्पर पोलीस अधीक्षक राजेश कुमार यांनी सांगितले की, नेपाळचा संशयित नागरिक असलेला फिरोज आलम हा गाझीपूर जिल्ह्यातील फतेहपूर येथे पुष्कळ वर्षांपासून रहात होता. तेथे त्याने निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि वर्ष २०१६ मध्ये पासपोर्टही बनवला होता. (भारतीय प्रशासनामध्ये राष्ट्रघातकी लोकांचा भरणा असल्यामुळे घुसखोरांना अशी ओळखपत्रे मिळतात. अशांना आजन्म कारागृहात डांबा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात ) एका संयुक्त चमूने त्याची तपासणी केली. त्यानंतर त्याच्या विरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

२. फतेहपूर मशीद समितीचे सदस्य मजीद खान यांनी सांगितले, ‘‘मौलाना फिरोज आलम हा मुसलमान मुलांना अयोग्य गोष्टी शिकवत होता. एका मुलाने ब्राह्मण मुलीला पळवून आणले होते. तेव्हा मौलानाने तिचे धर्मांतर करवून तिचा निकाह लावून दिला होता. याविषयी पोलिसांकडे तक्रार केली; पण कोणतीही कारवाई झाली नाही. (लव्ह जिहादच्या विरोधात कारवाई न करणार्‍या पोलिसांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात )

३. पोलिसांनी सांगितले की, देशभर धर्मांतराचे जाळे निर्माण करणार्‍या उमर गौतमचे या मौलानाकडे १० वर्षांपासून येणेजाणे होते. याप्रकरणीही पोलीस अन्वेषण करत आहेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *