सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा संयुक्त उपक्रम
देहली – पितृपक्षाच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने १८ सप्टेंबर या दिवशी एका विशेष ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेच्या कु. पौर्णिमा शर्मा यांनी ‘पितृपक्षामध्ये श्राद्ध करण्याचे महत्त्व, पितृपक्षामध्ये दत्ताचा नामजप का करावा ?’ आदी विषयांवर मार्गदर्शन केले. या प्रसंगी उपस्थित सर्वांनी भावपूर्णपणे ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप सामूहिकरित्या केला. या सत्संगाचे सूत्रसंचालन सनातनची साधिका कु. अक्षिता वाष्णेय यांनी केले. या सत्संगाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.
क्षणचित्र : सत्संगामध्ये ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करतांना ‘मन निर्विचार होणे’, ‘मन एकाग्र होणे’, अशा प्रकारच्या अनुभूती अनेकांना आल्या.
फरिदाबाद (हरियाणा) – पितृपक्षानिमित्त येथे २५ सप्टेंबर या दिवशी एका ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. संदीप मुंजाल यांनी ‘पितृपक्षामध्ये श्राद्ध का करावे ?, श्राद्ध केल्यावर होणारे लाभ’, यांविषयी माहिती दिली. तसेच उपस्थितांना त्यांनी ‘श्री गुरुदेव दत्त’ या नामजपाचे महत्त्व सांगितले आणि तो उपस्थितांकडून सामूहिकरित्या करवून घेतला. या प्रवचनाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सिद्धी अग्रवाल यांनी केले. या वेळी उपस्थित जिज्ञासूंच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक दैनिक सनातन प्रभात |