वर्ष १९८३ मध्ये आसाममध्ये धर्मांधांनी हत्या केलेल्या या हिंदूंना ‘हुतात्मा’ संबोधले जाते; मात्र शर्मन अली अहमद यांनी ‘ठार झालेले हुतात्मा नव्हते, तर खुनी होते. हे ८ जण मिया समाजाच्या (बंगाली भाषा बोलणार्या मुसलमानांच्या) हत्येस उत्तरदायी आहेत’ असे विधान केले होते. त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या विधानानंतर काँग्रेसने अहमद यांना नोटीस बजावली होती. (या विधानामुळे काँग्रेसला विरोध होणार, हे लक्षात घेऊन काँग्रेसने ही तोंडदेखली कारवाई केली आहे. काँग्रेसला जर हिंदूंविषयी खरेच काही वाटत असते, तर एव्हाना पक्षाने अहमद यांना पक्षातून काढून टाकले असते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात )