पोलिसांची बघ्याची भूमिका !धर्मांधांचा जमाव भगवा ध्वज काढत असतांना, तसेच परिसरात दगडफेक होत असतांना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, असे लोकांचे म्हणणे आहे. (असे पोलीस भारताचे कि पाकचे ? – संपादक दैनिक सनातन प्रभात ) |
A video from Chhattisgarh’s Kawardha district has surfaced online where allegedly a Muslim mob can be seen uprooting a saffron coloured flag and tearing it, leading to clashes and stone-peltinghttps://t.co/cSjHkVWZJW
— OpIndia.com (@OpIndia_com) October 5, 2021
यासंदर्भात माहिती देतांना पोलिसांनी सांगितले की, ३ ऑक्टोबर या दिवशी एका शांती समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात पुढे धार्मिक सण असल्यामुळे शांती आणि सद्भाव टिकून रहाण्याच्या दृष्टीने लोहारा चौकापासून धार्मिक ध्वज काढण्यास सांगितले होते. यासाठी बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या दोन्ही धर्मांच्या लोकांनी संमती दिली होती; परंतु घटनास्थळी काही समाजकंटक पोचले आणि त्यांनी उपद्रव केला. एका स्थानिक पत्रकाराने दिलेल्या माहितीप्रमाणे ५ वर्षांपूर्वी याच ठिकाणी भारतमातेचे लावलेले चित्र फाडण्यात आले होते.