Menu Close

‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान !’ या विषयावर ऑनलाईन विशेष संवाद !

‘हिंदु राष्ट्रा’चा संकल्प करा आणि हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात योगदान द्या ! – पू. नीलेश सिंगबाळ यांचे हिंदु समाजाला आवाहन

गेल्या 75 वर्षांत अल्पसंख्यांकांचे प्रचंड लांगूलचालन केल्यामुळे हिंदू बहुसंख्य असूनही त्यांना संवैधानिक संरक्षण मिळालेले नाही. मदरशांमध्ये कुराण शिकवण्यासाठी सेक्युलर सरकार अनुदान देते; मात्र हिंदूंना त्यांच्या धर्माचे शिक्षण देण्यासाठी विरोध केला जातो. हिंदूंची मंदिरे सेक्युलर सरकार चालवते; मात्र मशिदी-चर्चचे सरकारीकरण केले जात नाही. त्याचबरोबर लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, आतंकवाद, धर्मांतर, हिंदूंच्या हत्या, गोहत्या आदी अनेक समस्यांचा सामना हिंदूंना करावा लागत आहे. त्यामुळे भारतातील हिंदूंसाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे, म्हणून एकच उपाय आहे. तो म्हणजे भारतात ‘धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र’ स्थापन करणे ! यासाठी प्रत्येक हिंदूंने हिंदु राष्ट्राचा संकल्प करून तन-मन-धन अर्पण करून आपला वेळ आणि क्षमतेनुसार हिंदु राष्ट्राच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले. ‘हिंदु जनजागृती समितीचे 20 वे वर्ष : हिंदु राष्ट्र संकल्प अभियान !’ या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते. या वेळी देशभरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख आणि मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त करून समितीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे म्हणाले की, देशातील हिंदुविरोधी शक्ती, डावी विचारसरणी, सेक्युलर नेते, चित्रपटातील कलाकार यांनी हिंदु धर्म, संस्कृती, हिंदु राष्ट्र आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना अपकीर्त करण्याची मोहीम घेतली आहे. भारतात मुसलमान असुरक्षित असल्याचा आरोप केला जात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत तीच भाषा बोलत आहे. या दोघांमध्ये युती झाली आहे का, अशी शंका येते. याविषयी हिंदू समाजामध्ये जागृती झाली पाहिजे.

हिंदु जनजागृती समितीचे तेलांगणा आणि आंध्रप्रदेश राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी म्हणाले की, मुसलमान आणि ख्रिस्ती पंथीयांना ‘जगावर आपल्या पंथांचे राज्य यावे’ यासाठी ते प्रयत्नरत असल्यामुळे ती धार्मिक नव्हे, तर एक राजकीय संकल्पना आहे. हिंदु राष्ट्र ही राजकीय संकल्पना नसून धर्माधिष्ठित जीवन जगण्याची व्यापक संकल्पना आहे. हिंदु राष्ट्रात उच्च-नीच असा भेदभाव नसेल, तसेच कोणावरही अन्याय अत्याचार होणार नाहीत. याउलट मुगल आणि इंग्रज यांच्या राजवटीत मानवाला गुलाम बनवून विकण्याची अमानवीय प्रथा चालू झाली.

हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा म्हणाले की, हिंदु राष्ट्राची महान संकल्पना हिंदूंपर्यंत पोचवण्यासाठी समिती विविध माध्यमांतून प्रयत्न करत आहे. समितीने धर्मशिक्षणवर्ग, हिंदूंचे संघटन आणि अनेक उपक्रम चालू केले आहेत. हिंदु धर्मावरील आघातांना, हिंदूविरोधी शक्तींच्या षड्यंत्रांना विरोध करण्यासह हिंदु राष्ट्राच्या कार्यात हिंदूंना मोठ्या प्रमाणावर सहभागी केले जात आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *