नवी देहली – वर्ष १९७० ते २०२१ या काळात दुष्काळामुळे जगभरातील ६ लाख ८० सहस्र लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती जागतिक हवामानशास्त्र संघटनेने दिली. यामध्ये आफ्रिका खंडातील वर्ष १९७५, १९८३ आणि १९८४ मध्ये आलेल्या तीव्र दुष्काळांचा समावेश आहे. जगभरातील दुष्काळांचे निवारण करण्यासाठी जागतिक हवामानशास्त्र संघटना आणि ‘ग्लोबल वॉटर पार्टनरशीप’ या संघटनांनी एकत्र येऊन ‘एकात्मिक दुष्काळ व्यवस्थापन’ कार्यक्रम चालू केला आहे. या कार्यक्रमामध्ये जगभरातील अनेक संस्था सहभागी होतात.