Menu Close

धर्मांधांनी काढलेला भगवा ध्वज हिंदूंनी एकत्र येऊन पुन्हा त्याच ठिकाणी फडकावला !

(डावीकडे) भगवा ध्वज पुन्हा फडकवताना हिंदू युवक (उजवीकडे) शहरातील एकत्र आलेले हिंदू
(कवर्धा) छत्तीसगड – शहरातील मुख्य चौकात असलेला भगवा ध्वज धर्मांधांच्या गटाने काढून त्याची विटंबना केली. या घटनेचे वृत्त समजताच शहरातील शेकडो हिंदूंनी एकत्र येऊन त्याच ठिकाणी भगवा ध्वज पुन्हा फडकावला. या वेळी हिंदूंनी भगवा ध्वज हातात घेऊन ‘जय श्रीराम’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या.

१. धर्मांधांनी भगवा ध्वज काढल्यानंतर शहरात हिंसाचार झाला होता. ‘हिंसाचार करणार्‍या धर्मांधांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, उलट हिंदूंवर दडपशाही केली’, असे वृत्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी दिले आहे.

२. ध्वज हटवल्याच्या घटनेनंतर कवर्धा येथील हिंदूंनी विंध्यवासिनी देवीच्या मंदिरात पूजा-प्रार्थना करून राज्यातील काँग्रेस सरकारचा निषेध केला. तसेच गस्त घालणार्‍या पोलिसांसमोर हातात भगवे ध्वज घेऊन निषेध व्यक्त केला.

३. राज्यात हिंसाचार होत असतांना मुख्यमंत्री भूपेश बघेल उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे शेतकरी कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले होते. ‘हा राजकीय ‘स्टंट’ आहे’, असे मत नोंदवून स्थानिक हिंदूंनी याचा निषेध केला आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *