डॉ. जैन पुढे म्हणाले की, चर्चची घृणास्पद कृत्ये कुणापासून लपून राहिली नाहीत. केवळ एकट्या फ्रान्समध्ये मागील ७० वर्षांत पाद्र्यांकडून झालेल्या लैंगिक शोषणाला ३ लक्ष ३० सहस्र लहान मुले बळी पडली आहेत. पूर्वी अशा पद्धतींचे आरोप फ्रान्सचे चर्च मान्य करत नव्हते; पण यासंदर्भात एका आयोगाने अडीच वर्षे गहन अभ्यास करून एक अहवाल सिद्ध केला. त्यानंतर पाद्र्यांच्या कुकृत्याविषयी बिशपला क्षमा मागावी लागली. आज जगभरातील चर्च लैंगिक शोषण आणि व्यभिचार यांच्या आरोपांनी घेरली आहेत. भारतात चर्चकडून चालवण्यात येणार्या अनाथलयातील शेकडो अनाथ मुलांची विदेशात विक्री होत असल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. नक्षलवादी आणि पूर्वाेत्तर भारतातील आतंकवादी संघटना यांच्याशी त्यांचे संबंध असल्याविषयी आरोप झाले आहेत.