Menu Close

आतंकवाद्यांच्या भीतीमुळे काश्मीरमधील हिंदू पुन्हा पलायन करण्याच्या सिद्धतेत !

प्रातिनिधीक छायाचित्र
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये हिंदूंवर होणार्‍या आतंकवाद्यांच्या आक्रमणामुळे काश्मीर खोर्‍यातील हिंदू पुन्हा पलायन करण्याच्या सिद्धतेत आहेत. श्रीनगरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी मागील ४ दिवसांत २ हिंदू आणि २ शीख यांच्या हत्या केल्यानंतर येथे हिंदू अन् शीख यांच्यात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेखपुरा येथील हिंदु कुटुंबांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.

१. राज्यातील बडगाम जिल्ह्यातील शेखपुरा येथे वर्ष २००३ मध्ये हिंदूंचे पुर्नवसन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र आता या आक्रमणांमुळे आमचे घराबाहेर पाऊलही ठेवायचेही धाडस होत नसल्याचे येथील हिंदूंनी सांगितले.

२. ‘काश्मिरी पंडित संघर्ष समिती’चे अध्यक्ष संजय टिकू यांनी सांगितले की, आतंकवाद्यांच्या भीतीने बडगाम, अनंतनाग आणि पुलवामा या जिल्ह्यांतील अनुमाने ५ सहस्र काश्मिरी हिंदू पलायन करण्याच्या सिद्धतेत आहेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *