श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – गेल्या ४ दिवसांत श्रीनगरमध्ये २ हिंदू आणि २ शीख यांच्या जिहादी आतंकवाद्यांकडून हत्या झाल्यानंतर काश्मीरमध्ये पुन्हा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. मुसलमानेतरांवरील या आक्रमणांच्या मागे हिंदूंच्या संपत्तीवर झालेले अतिक्रमण सोडवण्याचा चालू झालेला प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे.
1000s of properties occupied by Muslims being restored to Kashmiri Hindu owners could be one of the reasons for increased attacks in the valleyhttps://t.co/FjSiafZC4s
— OpIndia.com (@OpIndia_com) October 8, 2021
१. वर्ष १९८९ नंतर आतंकवाद्यांच्या दहशतीमुळे काश्मीरमधून लक्षावधी हिंदूंनी पलायन केले. त्यांच्या संपत्तीवर स्थानिक मुसलमानांनी अतिक्रमण केले. आता कलम ३७० रहित केल्यानंतर राज्य प्रशासनाकडून एक संकेतस्थळ चालू करण्यात आले आहे. त्यानुसार देशात कुठेही वास्तव्य करणारे काश्मिरी हिंदू त्यांच्या अतिक्रमण करण्यात आलेल्या संपत्तीविषयी यावर तक्रार करू शकतात. या तक्रारीवरून प्रशासन कारवाई करून ही संपत्ती अतिक्रमणमुक्त करत आहे.
२. जम्मू-काश्मीरच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, प्रत्येक जिल्ह्यात अतिक्रमण करण्यात आलेल्या संपत्ती आहेत. सर्वाधिक १ सहस्र तक्रारी अनंतनागमध्ये आहेत. एका प्रकरणात ५ एकरहून अधिक भूमी बळकावण्यात आली होती. आता ही भूमी सोडवण्यात आली आहे. बहुतांश प्रकरणांत अतिक्रमण करणारे शेजारीच आहेत. (‘हिंदु-मुसलमान भाई भाई’ म्हणणारे याविषयी गप्प का आहेत ? – संपादक दैनिक सनातन प्रभात ) काही प्रकरणांत भूमाफिया सक्रीय आहेत.
३. काश्मिरी पंडित संघर्ष समितीचे पदाधिकारी संदीप म्हणाले की, केवळ हिंदू घर सोडून गेलेले नाहीत. बरेच शीख आणि मुसलमान यांनाही पलायन करण्यास भाग पाडण्यात आले होते. त्यांची मालमत्ताही परत मिळाली पाहिजे. (धर्मांधांमुळे काश्मिरी हिंदूंना पलायन करावे लागले, हे जगजाहीर असतांना हिंदूंनी अशी मागणी करणे, हा आत्मघातच नव्हे काय ? – संपादक दैनिक सनातन प्रभात )
४. श्रीनगरचे जिल्हाधिकारी महंमद एजाज असद म्हणाले की, जिल्ह्यात एकूण ६६० तक्रारी प्राप्त झाल्या. यांपैकी ३९० तक्रारी सोडवण्यात आल्या आहेत. १६ प्रकरणांमध्ये महसुली दस्तऐवजांत फेरफार करून अन्यांच्या नावावर भूमी केल्याचे दिसले.