मुंबई – शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यानंतर ‘बायजू‘ (बीवायजेयू) या शैक्षणिक आस्थापनाने शाहरुख खान यांची सर्व विज्ञापने थांबवली आहेत. या विज्ञापनांसाठी खान यांना वर्षाला ३ ते ४ कोटी रुपये मिळत होते. अद्याप आर्यनला जामीन मिळालेला नाही.