Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मिरज येथे ठिकठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर
मिरज – राष्ट्र आणि धर्म कार्य करणारी हिंदु जनजागृती समिती नेहमीच सामाजिक कार्यातही अग्रेसर असते. त्यातीलच एक भाग म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच मिरज येथील जिव्हेश्वर मंदिर, दुर्गामाता मंदिर, श्री अंबामाता मंदिर, सुभाषनगर येथे सौ. सुहासिनी कदम यांच्या घरी, तसेच घाटनांद्रे येथे पू. संतोष (माऊली) दाभाडे यांच्या आश्रमात आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांचा लाभ १९० रुग्णांनी घेतला. या शिबिरांत डॉ. श्रीमती मृणालिनी भोसले यांनी रुग्णांना तपासण्याची सेवा केली. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुवर्णा कराडे, सौ. रत्ना भंगाळे आणि श्री. द्वारकाधीश मुंदडा यांनी या शिबिरांसाठी सहकार्य केले.

१. श्री दुर्गामाता मंदिरातील शिबिराचा वयस्कर महिलांनी लाभ घेऊन मिळालेल्या औषधोपचारांविषयी समाधान व्यक्त केले.

२. सौ. सुहासिनी कदम यांच्या घरी झालेल्या शिबिरात महिलांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीविषयी विविध शंका विचारून निरसन करून घेतले.

३. ‘प्रत्येक मासाला असे शिबिर व्हावे’, अशी अपेक्षा जिव्हेश्वर मंदिराच्या व्यवस्थापनाने व्यक्त केली.

विशेष

१. मिरजमधील हिंदुत्वनिष्ठ श्री. आकाश भंडारे यांनी सर्व शिबिरांच्या ठिकाणी साहाय्य केले.

२. सर्व मंदिरांच्या ठिकाणी मंदिर व्यवस्थापनाकडून शिबिरासाठी चांगले सहकार्य मिळाले.

३. श्री अंबामाता मंदिराच्या ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या पुजारी श्रीमती सत्यभामा वायजळ (माई) (वय ८४ वर्षे) प्रकृती ठिक नसतांनाही शिबिरात पूर्णवेळ उपस्थित होत्या.

४. घाटनांद्रे येथे पू. संतोष (माऊली) दाभाडे यांनीही स्वतःची तपासणी करून घेतली आणि समितीच्या उपक्रमाविषयी समाधान व्यक्त केले.

५. शिबिरानंतर स्थानिक महिलांनी सौ. सुहासिनी कदम यांच्या घरी एकत्र येऊन नियमित सामूहिक नामजप करण्यास आरंभ केला आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *