Menu Close

आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथील जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन

पितृपक्षानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा संयुक्त उपक्रम

भाग्यनगर – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पितृपक्षानिमित्त ‘ऑनलाईन’ सामूहिक दत्त नामजपाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा समन्वयक श्री. चेतन गाडी यांनी ‘पितृपक्षामध्ये श्राद्ध करण्याचे महत्त्व, आपत्काळामध्ये श्राद्ध कसे करावे ?’, यांविषयी माहिती दिली. या वेळी अनेक जिज्ञासूंनी त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले. पितृपक्षाच्या कालावधीत चाललेल्या या कार्यक्रमामध्ये प्रतिदिन ३० मिनिटे सामूहिक नामजप घेण्यात आला.

जिज्ञासूंचे अभिप्राय

१. सौ. चामुंडेश्वरी – सामूहिक नामजप पुष्कळ एकाग्रतेने झाला. मी ‘श्री दत्तगुरूंच्या चरणी बसून नामजप करत आहे’, असे वाटले.

२. सौ. स्वरूपा – नामजप केल्याने पुष्कळ हलके वाटले. मला उच्च रक्तदाबाची समस्या होती. सामूहिक नामजप केल्याने रक्तदाबाची गोळी घेण्याची आवश्यकता पडली नाही. आता रक्तदाब नियंत्रणात आहे. नामजपामुळे मी ईश्वराच्या अगदी जवळ पोचले, असे वाटले.

३. सौ. भवानी – नामजपानंतर तणावाचे आणि नकारात्मक विचार अल्प झाले अन् साधना करण्याची तळमळ वाढली. आम्ही घरातील तीन सदस्यांनी मिळून सामूहिक नामजप केला. ज्या खोलीमध्ये आम्ही बसून नामजप केला, तेथे सकारात्मक शक्ती आणि चैतन्य जाणवत आहे.

४. श्री. धजधरी नागेश – साक्षात् श्री दत्तगुरु माझ्या समोर उभे आहेत, अशी अनुभूती आली.

५. श्री. सी.एस्. चक्रवर्ती – नामजप केल्याने ताण, नकारात्मक विचार आणि राग येणे अल्प झाले. मन शांत झाले आणि शरिरालाही विश्रांती मिळाली, असे वाटले. नामजपामुळे एकाग्रता साधली गेल्यामुळे इतर कामेही सहजपणे करू शकत आहे. बंद खोलीत नामजप केल्यानंतरही गार हवा स्पर्श करत आहे, असे वाटले.

६. श्री. अशोक रेड्डी – अनेक वर्षांपासून थांबलेले महत्त्वाचे काम नामजपामुळे अचानक पूर्ण झाले. मला माझ्या पूर्वजांचा आणि श्री दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळाला, असे वाटले.

७. सौ. अमृता – ४० वर्षांपूर्वी मृत झालेले माझे पूर्वज मला स्वप्नामध्ये दिसले आणि मला पुष्कळ थकवा आला.

८.  सौ. वीर राघवम्मा – श्राद्धाचे महत्त्व ऐकल्यानंतर साधनेचे महत्त्व समजले. नामजप केल्याने मन शांत झाले. आता अधिकाधिक वेळ नामजपाला देत आहे.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *