Menu Close

(म्हणे) ‘आर्यन खान मुसलमान असल्याने त्याला त्रास दिला जात आहे !’ – मेहबूबा मुफ्ती

(डावीकडे) अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान (उजवीकडे) पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला यासाठीच त्रास दिला जात आहे कारण तो मुसलमान आहे, अशा आशयाचे ट्वीट जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे. आर्यन खान याच्या जामिनाच्या अर्जावर १३ ऑक्टोबर या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे.

मेहबूबा यांनी म्हटले आहे की, ४ शेतकर्‍यांच्या हत्यांच्या प्रकरणी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाची निष्पक्ष चौकशी करण्याऐवजी २३ वर्षांच्या मुलाच्या नाहक पाठी लागण्यात येत आहे; कारण त्याचे आडनाव ‘खान’ आहे. भाजपच्या मतांच्या गणिताची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुसलमानांना लक्ष्य करण्यात येत आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *