Menu Close

भारतातील ‘लव्ह जिहाद’मध्ये होरपळणारे हिंदू आणि प्रशासनाची अनास्था !

१. संपूर्ण विश्वाला धर्मांतरित करू पहाणारे जगातील दोन मोठे पंथ एकमेकांसमोर उभे ठाकणे

‘गेल्या १५ दिवसांमध्ये केरळमधील ख्रिस्ती धर्मगुरु आणि धर्मांध मौलवी यांच्यात ‘लव्ह जिहाद’ अन् ‘नार्कोटिक्स जिहाद’ (अमली पदार्थांच्या माध्यमातून जिहाद) यांवरून कलगीतुरा रंगला आहे. अलीकडे ‘ख्रिस्ती तरुण आणि तरुणी यांना ‘लव्ह जिहाद’ अन् ‘नार्कोटिक्स जिहाद’ यांच्या जाळ्यात ओढण्यात येत आहे’, असे सायरो मलबार चर्चचे बिशप जोसेफ कलरंगट्ट यांनी म्हटले होते. त्यानंतर २०० हून अधिक मुसलमानांनी बिशप यांच्या घरासमोर त्यांच्या विरोधात निदर्शने केली. त्यात ‘कोत्तयाम महल मुस्लीम को-ऑर्डिनेशन’चे लोक सहभागी होते. त्यांनी बिशप यांच्या विरोधात तक्रारही प्रविष्ट केली.

२. धर्मांतर करण्याच्या ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्या विविध पद्धती

स्वातंत्र्यपूर्व काळापासून ख्रिस्त्यांनी गोड बोलून वैद्यकीय उपचार आणि शिक्षण यांच्या गोंडस नावाखाली अनेक आदिवासी, अनुसूचित जाती-जमाती, गरीब अशा भोळ्या हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले. स्वातंत्र्योत्तर काळात हिंदूंवर चर्चप्रणित शाळांच्या माध्यमातून लहानपणापासूनच ख्रिस्त्यांचे संस्कार झाले. ‘हिंदु धर्म हा पुरातन, बुरसटलेला आणि चुकीचा आहे’, अशी त्यांची मानसिकता करण्यात, तसेच त्यांच्यामध्ये हिंदु धर्माविषयी द्वेष निर्माण करण्यात ख्रिस्ती शाळा यशस्वी झाल्या. अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असतांना पोप जॉन पॉल भारतात आले  होते. त्या वेळी त्यांनी ‘संपूर्ण आशिया खंडात ख्रिस्ती धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणात करायचा आहे’, असे विधान केले होते.  याच भूमिकेला अनुसरून पुढे ख्रिस्ती संत मदर तेरेसा यांनीही त्याला दुजोरा दिला होता. दुसरीकडे धर्मांधांना संपूर्ण जग इस्लाममय करायचे आहे. त्यामुळे त्यांनी  यापूर्वी तलवारीच्या जोरावर कोट्यवधी लोकांना इस्लाम स्वीकारायला लावल्याचा इतिहास सर्वश्रुत आहे. सध्या विविध जिहादच्या माध्यमांतून त्यांच्याकडून लोकांचे धर्मांतर करण्याचे आणि त्यांना संपवण्याचे प्रयत्न राजरोसपणे चालू आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे ‘लव्ह जिहाद !’

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

३. धर्मांधांची स्त्रियांकडे पहाण्याची दृष्टी वाईट असल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आढळणे

महंमद बिन कासीम याने भारतावर आक्रमण करून लढाया जिंकल्या. त्याने भारतातून परत जातांना अनेक हिंदु स्त्रियांना बंदी बनवून अफगाणिस्तानात नेऊन विकले. अल्लाउद्दीन खिलजी याला जेव्हा रूपवती राणी पद्मिनीविषयी समजले, तेव्हा त्याने चित्तोड राज्यावर आक्रमण केले. शूर राजपुतांनी त्याचा प्राणपणाने प्रतिकार केला; परंतु जेव्हा राजपुतांचा पराभव होणार असल्याचे दिसू लागले, तेव्हा स्वाभिमानी राणी पद्मिनीने ८ सहस्र स्त्रियांसमवेत जोहार (सामूहिकपणे अग्नीला समर्पित होणे) केला. वर्ष १०१४ मध्ये महंमद गझनी मथुरा लुटण्यासाठी आला होता. तेथून परत जातांना त्याने ७० सहस्र स्त्रिया समवेत नेल्या आणि त्यांना इस्लामी देशांत पाठवले.

४. धर्मांधांनी हिंदु स्त्रियांशी विवाह करून मुले जन्माला घालणे आणि  त्यांच्या मुलांनीही इस्लामचेच अनुकरण करणे

मोहनदास गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांना धर्मांधांचा पुळकाच असायचा. धर्मांधांनी जरी हिंदूंना धर्मांतरित केले, तरी गांधी आणि नेहरू हे हिंदूंनाच गप्प करून धर्मांधांना पाठीशी घालत. चित्रपटसृष्टीतही सर्व ‘खाना’वळींच्या पत्नी या हिंदु आहेत. त्यांच्यापैकी अनेकांनी पहिल्या पत्नीकडून मुले जन्माला घातली आणि त्यांना सोडून नंतर पुन्हा दुसर्‍या हिंदु स्त्रियांशी लग्न केले. त्यांच्याकडून जन्मलेली सर्व मुले इस्लामचेच पालन करतात.

यासंबंधी ‘मिड डे’ या प्रथितयश नियतकालिकामध्ये ३० ऑक्टोबर २०१० या दिवशी लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु स्त्रियांना फसवून त्यांना मुसलमान मुले जन्माला घालण्याचे यंत्र बनवायचे असते’, अशा प्रकारचे विधान केले होते. खेळ असो कि राजकारण, तेथेही हेच चित्र दिसते.

माजी क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांच्यापासून ते अझरुद्दीन यांच्यापर्यंत असो किंवा केंद्रातील मुसलमान मंत्र्यांच्या पत्नी कोण आहेत, ते बघा ! जाणीवपूर्वक उच्चवर्णीय हिंदु महिलांशी लग्न करून त्यांना इस्लामचे अनुकरण करण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे त्यांची मुलेही इस्लामचे अनुकरण करतात.

थिरूवनंतपुरम् येथील थमारसेरी शहरातील चर्चच्या कॅटेसिस विभागाने एक पुस्तिका प्रसिद्ध केली होती. त्यात म्हटले आहे, ‘मौलवी ख्रिस्ती तरुणींना लव्ह जिहादमध्ये अडकवण्यासाठी काळ्या जादूचा वापर करतात. ते लेखणी (पेन), कपडे किंवा भेटवस्तू यांच्या माध्यमातून काळी जादू करतात. त्यातून पीडितेला वश केले जाते. त्यामुळे हा ‘लव्ह जिहाद’चाच परिणाम असल्याचे तरुणींच्या लक्षात येत नाही.’

५. केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून धर्मांधांची पाठराखण

केरळचे मुख्यमंत्री विजयन् हेही धर्मांधांचे समर्थक आहेत. ते म्हणतात की, एखाद्या समस्येसाठी संपूर्ण समाजाला दोष देता येत नाही. विजयन् यांचे जावई महंमद रियाज हे धर्मांध असून ते राज्य सरकारमध्ये मंत्रीही आहेत. त्यामुळे स्वत: मुख्यमंत्री धर्मांधांची बाजूच लावून धरत आहेत. केरळमध्ये ख्रिस्ती आणि मुसलमान हे दोन्ही समाज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे भविष्यात काय होईल, ते येणारा काळच ठरवेल !

६. ‘लव्ह जिहाद’ची महाराष्ट्रातील काही उदाहरणे

संभाजीनगर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर आहे. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे संभाजीनगरवर विशेष प्रेम होते. या शहरामध्ये ‘२०० रुपये घ्या आणि हिंदु मुलींना बाटवा’, असा फतवा काढण्यात आला होता. तेथे अनेक हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतरित करण्यात आले. विविध शाळा, महाविद्यालये, उपाहारगृहे आणि शीतपेयगृहे इत्यादी ठिकाणी नेहमीच अशी प्रकरणे पहायला मिळायची.

संभाजीनगर येथून जवळच असणार्‍या नगर जिल्ह्यात केवळ हिंदु मुलीच नाही, तर विवाहित महिलांनाही ‘लव्ह जिहाद’मध्ये फसवले जाते. त्यानंतर त्यांचे लैंगिक आणि आर्थिक शोषण केले जाते. त्यांच्याकडून मुले जन्माला घातली जातात आणि नंतर त्यांना सोडून दिले जाते. काहींना इतरांकडे सोपवले जाते.

असे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत; मात्र दुर्दैवाने एकही राजकीय पक्ष किंवा राज्यकर्ता ‘लव्ह जिहाद’चे अस्तित्व मान्य करायला सिद्ध नाही.

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

७. गुप्तचर विभागाने केंद्रीय गृह खात्याला ‘लव्ह जिहाद’विषयी अहवाल सादर केल्यावर केरळमध्ये ‘लव्ह जिहाद’ चालू असल्याचे उघडकीस येणे

केरळमध्ये प्रतिमास १०० हून अधिक मुलींचे धर्मांतर व्हायचे, हे केरळ उच्च न्यायालयामध्ये सिद्ध झाले आहे. वर्ष २००६ ते २००९ या कालावधीत ४ सहस्र लोकांचे धर्मांतर झाले. केवळ मल्लपुरम् जिल्ह्यात १ सहस्र ६०० मुली धर्मांतरित करण्यात आल्या. अशा प्रकारे सहस्रो तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. ही सर्व माहिती १०.६.२०१२ च्या ‘कला कौमुदि’ या मल्याळम् साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध झाली आहे. गुप्तचर विभाग आणि अन्वेषण यंत्रणा यांनी वर्ष २०१२ मध्ये केंद्रीय गृह खात्याला ‘लव्ह जिहाद’विषयी सादर केलेल्या अहवालानंतर केरळमध्ये पुष्कळ गदारोळ झाला. तेव्हापासून केरळमध्ये ‘लव्ह जिहाद’ हा प्रकार चालू असल्याचे लक्षात आले.

८. ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणामध्ये जामीन मिळवण्यासाठी धर्मांधाने केरळ उच्च न्यायालयामध्ये आवेदन प्रविष्ट करणे आणि मान्यवर व्यक्तींच्या अभ्यास समितीने ‘लव्ह जिहाद’ची वस्तूस्थिती मांडल्यावर ‘लव्ह जिहाद’ हा शब्द प्रचलित होणे

वर्ष २००९ मध्ये ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणात अडकलेला एक धर्मांध जामीन मिळवण्यासाठी केरळ उच्च न्यायालयामध्ये गेला होता. ‘तेथील महिलांना मोठ्या प्रमाणात ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवण्यात येऊन त्यांचे शारीरिक आणि आर्थिक शोषण करण्यात येते. त्यांचा देशविरोधी आणि आतंकवादी कारवायांसाठीही वापर केला जातो’, असे उच्च न्यायालयाच्या लक्षात आले. त्यामुळे न्यायालयाने धर्मांधाला जामीन नाकारला. एवढेच नाही, तर न्यायालयाने त्याच प्रकरणाचे जनहित याचिकेमध्ये रूपांतर केल्याचे समजते. त्यानंतर ‘व्हॉईस ऑफ जस्टिस’ या चेन्नईस्थित अशासकीय संघटनेच्या माध्यमातून एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये अत्यंत मान्यवर व्यक्तींची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. यामध्ये जयपूर येथील न्यायाधीश (नंतर सिक्कीम येथील उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून स्थानांतरित झालेले) सुरेंद्र भार्गव, भाग्यनगरचे माजी पोलीस महासंचालक पी.एस्. राव, जयपूर येथील महाधिवक्ता गुरुचरण सिंह गिल्ली, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ, तसेच लेखिका आणि समाजसेविका डॉ. आय.बी. विजयालक्ष्मी; भटक्या समाजातील लोकांसाठी कार्यरत असणार्‍या भिवंडी (महाराष्ट्र) येथील डॉ. सुवर्ण रावल, चेन्नईचे उद्योगपती पी. गणपति, तसेच एस्. रवि अन् रमेश गार्गी या सर्वांनी मिळून एका अभ्यास समितीची स्थापना केली आणि ‘लव्ह जिहाद’ची वस्तूस्थिती मांडली. तेव्हापासून म्हणजे वर्ष २००९ पासून ‘लव्ह जिहाद’ हा शब्द प्रचलित झाला.

९. ‘लव्ह जिहाद’च्या संकटात सहस्रो युवती होरपळत असतांनाही भारतातील सर्व राजकीय पक्ष आणि शासनकर्ते यांनी सत्य न स्वीकारणे

काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, आप ही राजकीय मंडळी तर ‘लव्ह जिहाद’चे वास्तव स्वीकारण्यास कधीच सिद्ध नसतात. याहून मोठे दुर्दैव म्हणजे ज्या हिंदु समाजाने काँग्रेसला झिडकारून सर्वांत मोठ्या हिंदुत्वनिष्ठ पक्षाला बहुमत दिले, त्या पक्षाचे तत्कालीन गृहमंत्री आणि सध्याचे संरक्षणमंत्री पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना म्हणतात, ‘लव्ह जिहाद’ कुठे आहे ? ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वातच नाही !’, अशा प्रकारे बोलण्यातून एक प्रकारे लव्ह जिहादलाच खतपाणी घातल्यासारखे होत नाही का ?

१०. लंडनच्या पोलीस आयुक्तांनी ‘लव्ह जिहाद’चे वास्तव मान्य करणे

‘भारतात ‘लव्ह जिहाद’मध्ये एका शीख मुलीला फसवण्यासाठी ८ लाख, जैन मुलीसाठी ७ लाख, ब्राह्मण मुलीसाठी ६ लाख, असे दर ठरवण्यात आले आहेत. ‘हिंदूंनी आपापल्या मुली आणि महिला यांचे रक्षण करावे’, असे लंडनचे पोलीस आयुक्त म्हणतात; परंतु आपल्या देशातील सर्व राजकीय पक्षांचे नेते आणि राज्यकर्ते म्हणतात, ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वातच नाही.’ सुदैवाने आपले भाग्य थोर; म्हणून योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या कट्टर हिंदु धर्मीय नेत्याने त्यांच्या राज्यात (उत्तरप्रदेशमध्ये) ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर थांबवण्यासाठी कायदा केला. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन गुजरातसारख्या राज्यांनीही धर्मांतरविरोधी कायदा केला; पण या कायद्याला विविध राज्ये आणि सर्वोच्च न्यायालय येथे विरोध केला जात आहे. या संदर्भातील सर्व याचिका सध्या न्यायालयात प्रलंबित आहेत.

अ. या पार्श्वभूमीवर चित्रपटसृष्टीतील वलयांकित मंडळी मात्र ‘प्रेम करतांना धर्म पहायचा का ?’, असे उपरोधिकपणे विचारतात.

आ. ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्यानंतर अनेक मुलींचा वापर देशविरोधी कारवायांमध्ये करण्यात आला आहे. अशी प्रकरणे उघड झाल्यावर धर्मांध विदेशात पळून जातात आणि या मुली अलगद त्या प्रकरणात अडकतात. या सर्व गोष्टींसाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएस्आय’ आणि ‘लष्कर-ए-तोयबा’ अन् ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ यांसारख्या आतंकवादी संघटना यांच्याकडून, तसेच डॉ. झाकीर नाईक यांच्यासारख्या धर्मांधांकडून पैसा मिळतो.

इ. अनेक धर्मांध अधिवक्ता हे न्यायालयांमध्ये नोटरी म्हणून काम करतात, तसेच त्याच कार्यालयातून मौलवीही उपलब्ध करून दिले जातात. याविषयीचा पर्दाफाश मुंबई उच्च न्यायालयात झाला होता. तेथे विवाहाची खोटी कागदपत्रे बनवली जातात, हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये सिद्ध झाले आहे. हे सर्व एकाच ठिकाणाहून चालू असते. नुकताच अशा कामासाठी देहलीच्या न्यायालयाचा कक्ष वापरण्यात आला. त्यामुळे एका धर्मांध अधिवक्त्याची सनद बार कौन्सिलने स्थगित केली आहे.

११. ‘लव्ह जिहाद’ला थांबवण्यासाठी  पोलीस आणि प्रशासन उदासीन !

‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांमध्ये पोलिसांमध्ये पराकोटीची उदासीनता आहे. जेव्हा पोलीस ठाण्यामध्ये अशा प्रकरणाची तक्रार करण्यासाठी मुलीकडील मंडळी येतात, तेव्हा तक्रारीमध्ये ‘लव्ह जिहाद’ हा शब्द लिहायला त्यांचे हात धजावत नाहीत. पीडितेचे आई-वडील आणि नातेवाईक धर्मांधाचे नाव, गाव इत्यादी सर्व माहिती सांगतात; परंतु पोलीस आरोपींना पकडण्यासाठी काहीही प्रयत्न करत नाहीत. ते तक्रारीमध्ये केवळ ‘मुलगी पळून गेली’, एवढेच नमूद करतात. पोलिसांवर अधिक दबाव आला, तरच थोडीफार कारवाई होते. अशा वेळी पोलीस संबंधितांनाच येण्या-जाण्याचा व्यय करण्यास सांगतात. सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा पोलिसांना सांगितले आहे की, गुन्हा घडला असेल, तर पोलिसांनी स्वतः अशा गुन्ह्यांची नोंद करायला पाहिजे; पण उलट असे दिसून येते की, धर्मांधाचे नाव ऐकल्यावरच पोलिसांचे हात-पाय थरथर कापायला लागतात. यावरून पोलीस यंत्रणा ‘लव्ह जिहाद’सारख्या गंभीर गुन्ह्याकडे कसे दुर्लक्ष करते, हेच लक्षात येते.

१२. शासनकर्ते, पोलीस आणि न्याययंत्रणा यांच्या अनास्थेमुळे हिंदूंवर अन्याय !

अनेक अधिवक्ते आणि न्यायाधीश यांची मानसिकताही अशीच आहे. गुजरातच्या उच्च न्यायालयाचे एक न्यायमूर्ती (त्यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये बढती झाली) ‘न्यायाधीश बार असोसिएशन’मधील समारंभात म्हणाले, ‘तुमच्या लग्नात कुणी आडकाठी केली, तर मी आहे सर्वोच्च न्यायालयात बसलेला !’ ‘असे म्हणून ते ‘लव्ह जिहाद’ला अप्रत्यक्षरित्या खतपाणी घालतात का ?’, असा प्रश्न निर्माण होतो.

ख्रिस्ती लोकांना १५२ ख्रिस्ती देशांचे साहाय्य मिळते, धर्मांधांना ५२ देश साहाय्य करतात; पण हिंदूंचे काय ? २०० हून अधिक देश असलेल्या या विश्वात एकही हिंदु राष्ट्र नाही. भारतातील हिंदूंना कुणीच वाली नाही ? कुणीच तसा नेता  नाही ? अन्याय झालेल्या हिंदूंच्या पाठीशी कुणीच उभे रहात नाही. ते एकटेच क्षीणपणे विरोध करतात.

१३. आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हिंदूंना हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याविना पर्याय नाही !

अशा परिस्थितीत हिंदु समाजाने धर्माचरण करायला हवे. आपली संस्कृती जपली पाहिजे. एकत्र कुटुंबपद्धतीसारख्या चांगल्या पद्धतीही जोपासायला हव्यात. तसे झाल्यासच पुढील पिढीवर चांगले संस्कार होऊन अधिक संपन्न समाज घडवता येईल. या सर्व गोष्टींत धार्मिक संघटनांनी भाग घायला पाहिजे. आज अनेक लोक ‘कुठे आहे ‘लव्ह जिहाद ?’, असे विचारतात. ‘अन्य धर्मीय ‘आमचे चांगले मित्र आहेत’, असे दाखले देतात. अशांना वस्तूस्थितीची जाणीव करून देणे आवश्यक आहे. यात सकारात्मक गोष्ट म्हणजे जैन समाजाने यातून बोध घेतला आहे. त्यांनी ‘बहेना भाग ना जाना’ असे कार्यक्रम घेतले. समाजातील स्त्रियांची योग्य प्रकारे जागृती केली. कोरोनामुळे घोषित केलेल्या दळणवळण बंदीच्या काळात सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे बंद होती; मात्र जैन समाजाने स्वतःच्या घरात किंवा वसाहती यांमध्ये तात्पुरती प्रार्थनास्थळे निर्माण केली. ते तेथे जाऊन धर्माचरण, एकत्रित प्रार्थना आणि उपासना करत होते. हे सर्व भूषणावह आहे. हिंदु समाजाने याचे अनुकरण करणे आवश्यक आहे. आपला धर्म आणि संस्कृती टिकली, तरच देश टिकेल; कारण धर्मांध वाढले, तर पोलीस यंत्रणा, प्रशासन, न्यायसंस्था आणि एकंदरीत संपूर्ण देश यांच्यासाठी धोका निर्माण होतो, हे वारंवार लक्षात आले आहे. हे खरेतर देशाच्या सार्वभौमत्वासाठी मोठे आव्हान आहे. त्यामुळे सर्व हिंदु समाजाने धर्माचरण करावे, धर्मबांधवांमध्ये जागृती निर्माण करावी आणि ‘लव्ह जिहाद’सारख्या दुष्प्रवृत्तींला वैध मार्गाने विरोध करावा ! असे करणेच उचित ठरेल.

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद आणि अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *