Menu Close

देहली येथे पाकिस्तानी आतंकवाद्याला अटक

पाकिस्तानी आतंकवादी महंमद अशरफ उपाख्य अली
नवी देहली – देहली पोलिसांच्या विशेष शाखेने देहलीतून एका पाकिस्तानी आतंकवाद्याला अटक केली. महंमद अशरफ उपाख्य अली असे याचे नाव असून तो पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एके-४७ रायफल, १ हातबॉम्ब, २ अत्याधुनिक पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली आहेत.

त्याच्याकडे बनावट भारतीय पारपत्र आढळले आहे. बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने बनवलेले भारताचे ओळखपत्रही पोलिसांच्या हाती लागले आहे. गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून तो देहली येथे रहात होता. त्याने येथे एका भारतीय महिलेशी विवाहही केला आहे. अली याची चौकशी करत आहेत. त्याच्यासमवेत आणखी किती लोक आहेत ?, हे जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. अवघ्या ३ दिवसांपूर्वी देहलीमध्ये आतंकवादी आक्रमणाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर या आतंकवाद्याला अटक होणे महत्त्वाचे मानले जात आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *