Menu Close

होय, हिंदु जागा होत आहे !

श्री दुर्गापूजेच्या मंडपांमध्ये अन्य धर्मियांच्या प्रवेशावर बंदी चे भित्तीपत्रक (मागील बाजूस लावलेले दिसत आहे )
सध्या मध्यप्रदेश राज्यात नवरात्रोत्सवात अहिंदूंना करण्यात आलेल्या प्रवेशबंदीचा विषय चांगलाच गाजतो आहे. अहिंदूंच्या प्रवेशबंदीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना पुढाकार घेऊन धर्महानी रोखण्यासाठी कृतीशील झाल्या आहेत. मध्यप्रदेशमधील रतलाम येथे विश्व हिंदु परिषदेने श्री दुर्गापूजेच्या मंडपांमध्ये, तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांमध्ये अन्य धर्मियांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. याविषयी त्यांनी संपूर्ण शहरात भित्तीपत्रके लावली आहेत. विहिंपच्या कृतीचे चोहोबाजूंनी स्वागत होत आहे. याच मध्यप्रदेशच्या इंदूरमधील आणखी एक घटना चांगलीच चर्चेत आहे. येथे एका खासगी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या गरबा नृत्याच्या कार्यक्रमात ४ धर्मांधांच्या उपस्थितीवर बजरंग दलाने आक्षेप घेत त्यांच्याविरुद्ध तक्रार केली. त्यामुळे पोलिसांनी त्या चौघांना अटक केली. या दोन्ही घटनांवरून धर्मांध, पुरो(अधो)गामी आदी मंडळी बरीच आदळआपट करत आहेत.

अंतर्मुख होणे आवश्यक !

या घटनांनंतर पुरो(अधो)गाम्यांकडून हिंदूंना ‘खलनायक’ किंवा ‘हिटलर’ यांची उपाधी देऊन हिंदूंची यथेच्छ अपकीर्ती केली जाईल. मग अमेरिकेतील एखादी फुटकळ संघटना एखादा अहवाल काढून भारतात अल्पसंख्यांकांवर अन्याय होत असल्याची ओरड करील. मग तो अहवाल डोक्यावर घेऊन काँग्रेसी, पुरो(अधो)गामी गावभर फिरतील; परंतु यांपैकी एकही जण ‘हिंदूंना हे पाऊल का उचलावे लागले ?’, याचा अंतर्मुख होऊन विचार करणार नाही. त्यामुळे हिंदूंनाच याची जाणीव त्यांना करून द्यावी लागणार आहे. आज देशात हिंदूंसमोर लव्ह जिहादचे मोठे संकट आहे. उत्तरप्रदेशमध्ये तर लव्ह जिहादचा प्रकार घडला नाही, असा बहुधा दिवस जात नसावा. केरळमध्येही हे प्रकार राजरोसपणे चालू आहेत. इतके की, आता ख्रिस्त्यांच्या चर्च संस्थेकडूनही लव्ह जिहादच्या विरोधात त्यांच्या पंथात मोठ्या प्रमाणात जागृती केली जात आहे. आजच्या घडीला हिंदु तरुणी लव्ह जिहादला सर्वाधिक प्रमाणात बळी पडत आहेत. धर्मांधांकडून मिळेल त्या संधीचा पुरेपूर अपलाभ उठवत हिंदु मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवले जात आहे. धर्मांध नवरात्रोत्सवाकडे अशीच एक संधी म्हणून बघतात. नवरात्रोत्सवांमध्ये दांडिया मोठ्या प्रमाणात खेळला जातो. धर्मांध यात स्वतःचे नाव आणि वेश पालटून सहभागी होतात, कपाळावर टिळाही लावून घेतात, हिंदु मुलींशी ओळख करतात आणि पुढे त्यांना लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढतात. त्यातून त्यांचे लैंगिक शोषण करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करतात. हे प्रकार इतके राजरोसपणे चालू असतात की, त्याचे निद्रिस्त हिंदूंना काहीच वाटेनासे झाले आहे. अशात विहिंप आणि बजरंग दल या हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी दाखवलेली जागरूकता महत्त्वाची ठरते. नवरात्रोत्सव हा केवळ हिंदूंचा सण असल्याने त्यात अशुद्ध हेतूने घुसखोरी करणार्‍या धर्मांधांना पायबंद घातलाच पाहिजे. हिंदूंचे धार्मिक सण शास्त्रोक्त पद्धतीने साजरे करतांना त्यातील पावित्र्य राखले गेलेच पाहिजे. रतलाम येथील घटनेत विहिंपने स्पष्टपणे सांगितले, ‘अहिंदू लोक हिंदूंच्या धार्मिक श्रद्धा आणि पूजा करण्याची पद्धत यांचे पालन करत नसल्याने त्यांनी नवरात्रोत्सवात सहभागी होऊ नये. गेल्या काही वर्षांपासून मंडपांमध्ये अहिंदु तरुणांकडून समाजविघातक कृत्ये केली जात आहेत.’ हिंदूंना विरोध करणारे या गोष्टींचा कधी अंतर्मुख होऊन विचार करतील का ? हिंदूंविरुद्ध जशी ओरड केली जाते, तशी त्यांनी कधी लव्ह जिहाद करणार्‍या धर्मांधांविरुद्ध केली आहे का ? जर अन्य पंथामध्ये मूर्तीपूजा मानतच नसतील, तर त्या पंथातील अनुयायांना हिंदूंच्या नवरात्रोत्सवात सहभागी होण्याचा अधिकारच काय ? नवरात्रोत्सवात ९ दिवस त्या शक्तीस्वरूपा श्री दुर्गादेवीची पूजा केली जाते. या मंडळींचे लक्ष पूजेपेक्षा केवळ गरबा नृत्याकडे असते. त्यांचा हेतू अत्यंत अशुद्ध असतो. म्हणूनच अशांना पवित्र नवरात्रोत्सवापासून दूर ठेवणे, ही धर्महानी रोखणारी कृतीच आहे.

लव्ह जिहादविरोधी कायदा करा !

गेल्या काही वर्षांपासून मूठभर धर्मांधांनी देशातील १०० कोटी हिंदूंसमोर लव्ह जिहादचे संकट उभे केले असतांना आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी या संकटापासून हिंदूंना वाचवण्यासाठी काहीही केलेले नाही, ही वस्तूस्थिती नाकारता येणार नाही. अगोदर लव्ह जिहाद, त्याद्वारे होणारे धर्मांतर आणि नंतर होणारी शारीरिक अन् मानसिक छळवणूक यांमध्ये हिंदु तरुणी होरपळून निघत आहेत. त्यांच्या किंकाळ्या आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना कधीही ऐकू गेल्या नाहीत, हे हिंदूंचे दुर्दैव आहे. त्यात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची कृतीशीलता म्हणूनच महत्त्वाची आहे. लव्ह जिहादचे प्रकार असेच चालू राहिले, तर हिंदूंची लोकसंख्या झपाट्याने घटेलच; पण हिंदु धर्माचे तेवढे शत्रूही निर्माण होतील, हे जाणून हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी बाह्या सरसावल्या आहेत. हिंदु जनजागृती समितीने लव्ह जिहादविषयी सर्वप्रथम वैध मार्गाने जनजागृती केली. त्यावर एक ग्रंथही प्रकाशित केला. अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही आपापल्या परीने याविषयी जागृती केली. परिणामस्वरूप आज समाजातून लव्ह जिहादला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आहे, तसेच तो रोखण्यासाठी वैध मार्गाने प्रयत्नही होऊ लागले आहेत. खरेतर बहुसंख्य हिंदू असलेल्या या देशात हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर ही वेळ यायला नको होती. त्यासाठी सरकारी पातळीवरूनच लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करायला हवा होता; पण काँग्रेसींच्या धर्मांधप्रेमी राजवटीत ते कदापि शक्य नव्हते. आता केंद्रातील विद्यमान सरकारने याविषयी कायदा करावा, अशी हिंदूंची मागणी आहे. याचा शुभारंभ मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथील भाजपशासित राज्यांनी केलाच आहे. शेवटी कुठल्याही समाजासाठी अन्याय सहन करण्याला मर्यादा असतात. मध्यप्रदेशमध्ये ज्याप्रमाणे हिंदूंनी जागरूकता दाखवून धर्महानी रोखली, तशी आता अन्य राज्यांतील हिंदूही रोखतील, यात शंका नाही; कारण आता हिंदु जागा होत आहे !

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *