Menu Close

काश्मीरमधील हिंदूंवरील आक्रमणाविरोधात निषेध फेरी !

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे निषेध करण्यासाठी एकत्र आलेले हिंदुत्वनिष्ठ
कोल्हापूर – गेल्या आठवड्यात काश्मीरमध्ये हिंदु बांधवांवर आक्रमण करण्यात आले. यामुळे संपूर्ण हिंदु समाजात असंतोष निर्माण झाला आहे. आपल्या भारतभूमीमध्ये आपण परकियांसारखे रहातो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा निषेध म्हणून कोल्हापूर शहरात समस्त हिंदु परिवाराच्या वतीने १३ ऑक्टोबर या दिवशी निषेध फेरी काढून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन देण्यात आले. ही फेरी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी काढण्यात आली.

या वेळी सर्वश्री विनायक माने, प्रकाश सूर्यवंशी, राहुल कदम, मानसिंग पाटील, राजू गडकरी, सौरभ निकम, किरण पाटील, अविनाश थोरवत, प्रमोद ढोले, अमर चव्हाण, जयसिंग शिंदे, आशिष पोवार, अनिरुद्ध कोल्हापुरे, सूरज सुर्वे यांसह अन्य उपस्थित होते.

समस्त हिंदू परिवारा’च्या वतीने प्रत्येक सोमवारी हिंदूंनी एकत्र येण्यासाठी प्रारंभ झाला !’ – राहुल कदम, रवीराज चौगुले आणि समस्त हिंदू परिवार

हिंदूंवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडणे, त्यांचे संघटन करणे, तसेच हिंदूंच्या प्रश्नांना वाचा फोडणे यांसाठी समस्त हिंदू परिवाराच्या वतीने कोल्हापूर शहरात पाण्याच्या खजिन्याजवळ, भूमी अभिलेख कार्यालयासमोर असलेल्या महादेव मंदिरात प्रत्येक सोमवारी सायंकाळी ७ वाजता सर्व हिंदूंनी एकत्र येऊन भेटण्यास प्रारंभ केला आहे. मे मासापासून या कृतीला प्रारंभ करण्यात आला असून ज्यांना हिंदु धर्मासाठी काहीतरी कृती करण्याची इच्छा आहे, त्यांनी सोमवारी सायंकाळी ७ वाजता महादेव मंदिरात एकत्र यावे, असे आवाहन ‘समस्त हिंदू परिवारा’च्या वतीने श्री. रवीराज चौगुले आणि श्री. राहुल कदम यांनी केले आहे. ‘अशाच प्रकारे हिंदूंनी त्यांच्या भागात सोमवारी सायंकाळी ७ वाजता एकत्र येऊन हिंदूंचे संघटन चालू करावे’, असे आवाहनही श्री. कदम आणि श्री. चौगुले यांनी केले आहे.

या वेळी करण्यात आलेल्या मागण्या

  • या आक्रमणामागील मुख्य सूत्रधारापर्यंत पोचून त्यांचा शोध घेऊन त्यांना योग्य ती शिक्षा करावी. स्थानिक काश्मिरी हिंदूंना संरक्षण द्या आणि त्यांचे योग्य पुनर्वसन करा.
  • भविष्यात जे हिंदु बांधव काश्मीरमध्ये चाकरी, व्यवसाय, पर्यटन यांसाठी येतील, त्यांचे संरक्षण करा.
  • आतंकवादी कारवाई करण्यासाठी जे स्थानिक नागरिक साहाय्य करतात, त्यांच्यावर कठोर कारवाई करा.
  • भारतीय सैन्याच्या कारवाईविषयी साशंकता निर्माण करणार्‍यांवर गुन्हा नोंद करावा.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *