वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक दैनिक सनातन प्रभात
गुरुग्राम (हरियाणा) – येथील ‘सॅटो टॉयलेट्स एशिया’ (SATO Toilets Asia) नावाचे आस्थापन सॅनिटरी वस्तूंचे (आरोग्य चांगले राखण्यासंबंधीच्या वस्तूंचे) उत्पादन करून त्यांची विक्री करते. यांमध्ये साबण, सॅनिटायझर, हँड वॉश आदींचा समावेश आहे. याचा प्रसार करण्यासाठी या आस्थापनाने एक विज्ञापन बनवून ते ट्विटरवर पोस्ट केले होते. या विज्ञापनामध्ये श्री दुर्गादेवी दाखवण्यात आली होती. यामध्ये तिच्या हातांमध्ये साबण, सॅनिटायझर आदी वस्तू दाखवण्यात आल्या होत्या. ‘श्री दुर्गादेवी शस्त्रांद्वारे दुष्टांचा नाश करते, तसेच या उत्पादनांद्वारे किटाणूंचा नाश करते’, असा संदेश या विज्ञापनातून देण्यात आला होता.
या विज्ञापनाची माहिती हिंदुत्वनिष्ठांना मिळाल्यावर त्यांनी हिंदु जनजागृती समितीला याविषयी सांगितले. समितीने सामाजिक माध्यमांद्वारे याविषयी जागृती करणारी पोस्ट प्रसारित करत या विज्ञापनाचा वैध मार्गाने विरोध करण्याचे आवाहन केले. धर्माभिमानी हिंदूंनी केलेल्या संघटित विरोधानंतर काही घंट्यांतच या आस्थापनाने विज्ञापन हटवले.