Menu Close

शैक्षणिक जिहाद !

‘मार्क्स जिहाद’ मागील कारस्थान हिंदू जाणून आहेत, हे साम्यवाद्यांनी लक्षात घावे. 

देहली विद्यापिठ
‘जिहाद’ हा शब्द आपण सर्वजणच ऐकून आहोत. त्याची व्याप्ती, तसेच परिणाम याचीही तितकीच कल्पनाही आपल्याला आहे. काही दशकांपूर्वी हा जिहाद केवळ ‘लव्ह जिहाद’ या एकाच संकल्पनेसाठी ओळखला जात होता; पण कालांतराने जिहादची व्याप्ती वाढत गेली. त्यातूनच ‘लँड (भूमी) जिहाद’, ‘नार्काेटिक (अमली पदार्थ) जिहाद’, ‘पॉप्युलेशन (लोकसंख्या) जिहाद’ अशा अनेक माध्यमांद्वारे जिहाद केला जाऊ लागला. अर्थात्च यात सर्वसामान्य हिंदू होरपळला जाऊ लागला. आता या जिहादमध्ये आणखी एका प्रकाराची भर पडली आहे. जिहादचा आता शैक्षणिक क्षेत्रातही शिरकाव झालेला आहे. ‘मार्क्स जिहाद’ या नव्या रूपातून तो सर्वांसमोर आला आहे. भारत देश हीच त्याची पहिली शिकार ठरत आहे. भारतातील देहली विद्यापिठात चालू असलेल्या प्रवेशप्रक्रियेत ‘केरळ राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक प्राधान्य मिळत आहे. देहली विद्यापिठाच्या अंतर्गत असणारे किरोडीमल महाविद्यालयातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आणि ‘राष्ट्रीय जनतांत्रिक शिक्षक मोर्चा’चे माजी अध्यक्ष राकेशकुमार पांडेय यांनी या प्रकरणाला ‘मार्क्स (गुण) जिहाद’ असे संबोधले आहे. गेल्या काही वर्षांपासून साम्यवादी आणि जिहादी विचारसरणीचे लोक केरळच्या विद्यार्थ्यांना देहली विद्यापिठात घुसवत आहेत. ‘केरळ राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या उत्तरपत्रिका पडताळतांना त्या विद्यार्थ्यांना मुक्तपणे म्हणजे अगदी १०० टक्के गुण दिले जातात. अशा स्वरूपाचे षड्यंत्र रचून विद्यार्थ्यांना देहली विद्यापिठात घुसवले जाते. असे करणे म्हणजे शैक्षणिक क्षेत्र कलुषित करण्याचाच हा एक प्रयत्न आहे. ही घुसखोरी करण्यामागील कारस्थान हिंदू जाणून आहेत, हे साम्यवादी आणि जिहादी विचारसरणी असणार्‍यांनी लक्षात घ्यावे. प्राध्यापक राकेशकुमार पांडेय यांनी जिहादचे वास्तव समोर आणल्यावर हिंदुद्वेष्ट्यांना पोटशूळ उठला नाही, तरच नवल ! अनेकांनी त्यांच्या विरोधात टीका केली, त्यांच्या विधानावर आक्षेप घेतला, तसेच ‘हा ‘मार्क्स जिहाद’ कसा नाही, हेही आटोकाट सांगण्याचा प्रयत्न केला. ‘प्राध्यापक कशा प्रकारे द्वेषाची पेरणी करत आहेत, तसेच धर्मांत फूट पाडत आहेत’, याविषयी बोलून अनेकांनी आपापला हिंदुद्वेषाचा कंड शमवला. ‘मार्क्स जिहाद’ अस्तित्वात आहे’, असे सांगत राकेशकुमार पांडेय यांनी वाद निर्माण केला’, असेही म्हटले गेले. ज्यांनी त्यांच्या विरोधात टीकेचे हत्यार उपसत कारवाईची मागणी केली आहे, त्यांना तरी या जिहादविषयी कितीशी माहिती असेल ? हा प्रश्नच आहे. डावी विचारसरणी असणारे, तसेच काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना, शिक्षक आणि काँग्रेसचे खासदार शशी थरूर या सर्वांचाच यात समावेश आहे. ‘नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष कुणाल सेहरावत म्हणाले, ‘‘प्राध्यापकांचे विचार पुष्कळ वाईट आहेत.’’ असे जर आहे, तर मग विद्यापिठात विद्यार्थ्यांची केली जाणारी वरील स्वरूपातील भरती प्रक्रिया कितपत योग्य आहे ? काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी तर पांडेय यांचे विधान ‘हास्यास्पद’ असल्याचे म्हटले आहे. हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसला ‘जिहाद’चा पुळका आहेच. त्यामुळे थरूर यांनी देहली विद्यापिठाच्या कृतीची पाठराखण केली, तर त्यात नवल ते काय ? पांडेय यांच्या विधानामुळे झालेल्या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य उघडकीस येईल कि काय ? या भयापोटी शशी थरूर हे ‘हास्यास्पद विधान’ असे म्हणून प्रकरणाला भलत्याच दिशेला नेत आहेत, हे धर्मप्रेमी हिंदू ओळखून आहेत. सरकारने विरोधकांच्या विधानांकडे न पहाता देशासाठी धोकादायक ठरणार असलेल्या या ‘मार्क्स जिहाद’च्या मुळाशी जायला हवे. केरळ शिक्षण मंडळाकडून करण्यात येणार्‍या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाविरोधात चेन्नई येथील गुनीशा या विद्यार्थ्यानेही देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. त्यामुळे पांडेय यांचे विधान बेधडकपणे खोटे ठरवता येणार नाही.

जिहाद समूळ नष्ट करा !

खरे पहाता २० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा नियम असतांना त्या विद्यापिठात २० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. ही विद्यार्थ्यांची करण्यात आलेली घुसखोरीच होय. बरे या विद्यार्थ्यांनी म्हणे १०० टक्के गुण मिळवले होते, असेही सांगण्यात आले. प्रत्यक्षात त्यांनी हे गुण स्वतःच्या बुद्धीमत्तेच्या जोरावर मिळवले आहेत कि त्यांना अशा प्रकारच्या घुसखोरीसाठी ते असेच देण्यात आलेले आहेत, याचा शोध घ्यायला हवा; कारण ‘या विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता तितकीशी चांगली नाही, तसेच त्यांना हिंदी आणि इंग्रजी या भाषांचेही अपेक्षित असे ज्ञान नाही. त्यांना इयत्ता ११ वीतही १०० गुण मिळालेले नाहीत’, असे मत देहली विद्यापिठाच्या शिक्षकांनी व्यक्त केलेले आहे. ‘विद्यार्थ्यांची ही स्थिती पहाता केरळ शिक्षण मंडळाच्या मूल्यमापन प्रणालीलाच विरोध करायला हवा’, असे वाटते. प्रवेश देण्यात आलेल्या या विद्यार्थ्यांमध्ये निम्म्याहून अधिक विद्यार्थी हे मुसलमान समाजाचे आहेत. यातूनच ‘मार्क्स जिहाद’चे षड्यंत्र उघड होते.

आज देहली विद्यापीठ चर्चेत आले आहे. काही काळापूर्वी देहली येथील ‘जे.एन्.यु.’ विद्यापीठ हे तेथे विद्यार्थ्यांनी दिलेल्या विखारी आणि देशविघातक घोषणांमुळे चर्चेत आले होते. ‘देहली विद्यापिठाची स्थिती पहाता तेही ‘जे.एन्.यु.’ विद्यापिठाच्या पावलावर पाऊल ठेवत आहे’, असेच वाटते. त्यामुळे ‘तेथे हिंदुद्वेषी, तसेच साम्यवादी विचारसरणी यांची पेरणी केली जात असेल’, अशी शंका आल्यावाचून रहात नाही. पांडेय यांनी व्यक्त केलेल्या ‘मार्क्स जिहाद’चा हा प्रारंभ आहे. त्याची विषवल्ली आणखी वाढू नये, तसेच देहलीसह तो अन्य राज्यांमध्ये पसरू नये, याची वेळीच दक्षता घ्यायला हवी. जिहादच्या नवनवीन प्रकारांना सामोरे जाण्यापेक्षा मुळात ते निर्माणच होऊ नयेत, यासाठी सरकारने पावले उचलायला हवीत. गुणांना जिहादमध्ये न अडकवता त्यांचा देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी वापर करणे हे कालसुसंगत ठरेल !

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *