अशिक्षित, गोरगरीब, श्रमिक यांना आर्थिक, वैद्यकीय साहाय्य देऊन, उज्ज्वल भविष्याची स्वप्ने दाखवून आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर घडवण्याचे मिशनर्यांचे उद्योग अजूनही चालूच आहेत. आदिवासींची सेवा करून त्यांना ख्रिस्ती बनवण्याचे प्रकार चालू असतांनाच आता या मिशनर्यांचे प्रमुख लक्ष्य असाहाय्य भिकारी ठरले आहेत. या बिगरख्रिस्ती भिकार्यांची, गर्दुल्ल्यांची सेवा आणि त्यांना साहाय्य करून त्यांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर घडवण्याची पद्धतशीर मोहीमच सध्या चालू असल्याची माहिती हाती आली आहे.या मोहिमेत प्रामुख्याने मुसलमान भिक्षेकरी आमिषांना फसत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी चक्क काही विदेशी मिशनरीही ठाणे जिल्ह्यात दाखल झाले आहेत, उदा. लीन नावाची एक विदेशी तरुणी ही वसईत आगगाडी स्थानकावर भिकार्यांची सेवा करते. त्यांना कपडे, जेवण देणे, तसेच औषधोपचार करणे, अशीही सेवा चालू आहे. ख्रिस्ती धर्मांतराची ही एक पद्धतशीर मोहीमच चालू असल्याचे निदर्शनास आले.
धर्मांतर करण्याची पद्धत
असाहाय्य भिकार्यांची सेवा करायची, त्यांना अन्न-पाणी, कपडे द्यायचे, वैद्यकीय उपचार करायचे. हे सर्व करत असतांना ख्रिस्ती विचारांचा मारा त्यांच्यावर करत रहायचा. त्यासाठी त्यांना ख्रिस्ती वचने सांगायची, त्यांना समजणार्या भाषेत ख्रिस्ती धर्मग्रंथ द्यायचे, प्रभु येशूचे छायाचित्र द्यायचे, असा हा धर्मांतराचा प्रकार आहे.
– मुंबई, वार्ताहर (१७.१०.२०११) (ही स्थिती ४ वर्षांपूर्वीची आहे. आता तर अशा प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ख्रिस्ती मिशनर्यांकडून विविध आमिषे दाखवून राजरोसपणे धर्मांतर केले जात आहे. हे थांबवण्यासाठी शासन काही ठोस कृती करणार का ? – संपादक)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात