Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भांडुप (मुंबई), खालापूर (रायगड) आणि उमरगाव (गुजरात) येथे विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रम साजरा !

भांडुप (मुंबई) येथे उपस्थित असलेले धर्मप्रेमी
मुंबई – विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजन करण्याची विशेष परंपरा आहे. या दिवशी नित्य जीवनात उपयोगात असणार्‍या वस्तूंचे शस्त्रांच्या रूपात पूजन केले जाते. १५ ऑक्टोबर या दिवशी भांडुप (मुंबई), खालापूर (जिल्हा रायगड) आणि उमरगाव (गुजरात) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शस्त्रपूजन करण्यात आले.

उमरगाव (तालुका वलसाड, गुजरात) येथे दर्शनार्थींकडूनही शस्त्रपूजन !

उमरगाव येथे उपस्थित असणारे दर्शनार्थी आणि धर्मप्रेमी
येथील अंबामाता मंदिर येथे शस्त्रपूजनाचा कार्यक्रम झाला. या वेळी मंदिरात येणार्‍या दर्शनार्थींनीही शस्त्रपूजन केले. हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री निखिल दर्जी, भूपेश भानुशाली, धवल रावल, संजय महाजन आणि राजेंद्र झोपे या वेळी उपस्थित होते.

भांडुप (मुंबई) येथे गावदेवी मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा पुढाकार !

भांडुप (पश्चिम) येथील गावदेवी टेकडी येथील श्री गावदेवी मंदिरात शस्त्रपूजन करण्यात आले. यासाठी गावदेवी मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. सिद्धेश पाटील आणि उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत नाईक यांनी पुढाकार घेतला. या वेळी श्री. विजय ठोंबरेगुरुजी यांनी पौरोहित्य केले. संकल्प विधी श्री. सिद्धेश पाटील यांच्या हस्ते पार पडला. बजरंग दलाचे श्री. विनोद जैन आणि श्री. सतीश कोटीयन यांच्यासह स्थानिक धर्मप्रेमी या वेळी उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश घाटकर यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी विजयादशमीनिमित्त हिंदूंना दिलेल्या संदेशाचे वाचन केले.

खालापूर (रायगड) येथे हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गांतील धर्मप्रेमींचा अधिक सहभाग !

खालापूर (रायगड) येथे उपस्थित असलेले धर्मप्रेमी
खालापूर तालुक्यातील चिंचवली, शेकीन येथील हनुमान मंदिर ग्रामस्थ मंडळाच्या वतीने शस्त्रपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गात येणारे सर्वश्री किशोर पडवळ, प्रसाद जाधव, जयेश चव्हाण, प्रशांत मोरे, शंकर जाधव, राम जाधव, अमोल जाधव, रमेश जाधव, कमलाकर जाधव आणि वासुदेव शिंदे आदी धर्मप्रेमी या वेळी उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *