Menu Close

सिरूवाचूर (तामिळनाडू) येथे कालीअम्मन मंदिराच्या परिसरातील हिंदूंच्या देवतांच्या १४ मूर्तींची तोडफोड !

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक दैनिक सनातन प्रभात

पेरंबेलूर  (तामिळनाडू) – जिल्ह्यातील सिरूवाचूर येथील मधुरा कालीअम्मन मंदिराच्या परिसरात असलेल्या हिंदूंच्या देवतांच्या १४ मूर्तींची हिंदुद्वेष्ट्यांनी तोडफोड केली. भक्तांच्या हे निदर्शनास आल्यावर त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. ही घटना ७ ऑक्टोबर या दिवशी घडली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. राज्यात द्रमुक पक्ष सत्तेत आल्यावर येथील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती आणि मंदिरांच्या तोडफोडीचे प्रकार वाढले आहेत.

१. मधुरा कालीअम्मन हे तामिळनाडू येथील प्रसिद्ध मंदिर असून ही देवी राज्यातील लाखो हिंदूंची कुलदेवी आहे. आठवड्यातील केवळ सोमवार आणि शुक्रवार या २ वारीच देवी मुख्य मंदिरात वास्तव्यास असते आणि त्याच दिवशी भाविकांना तिचे दर्शन घेता येते.

२. इतर दिवशी देवीचे वास्तव्य मंदिरामागील टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरात असते जिथे सेलियास्वामी, पेरियास्वामी, करूप्पास्वामी आणि अय्यनार आणि अन्य काही देवता यांची छोटी मंदिरे आहेत. या ठिकाणी केवळ पुरुषांनाच प्रवेश आहे. काहीजण तेथे पूजेसाठी गेले असता, त्यांना या देवतांच्या मूर्तींचे डोके, तसेच हात-पाय तोडले होते.

मागासवर्गीयांसाठी कार्यरत असलेल्या व्हीसीके पक्षाचा ब्राह्मणद्वेषी प्रचार !

पेरंबेलूर  जिल्ह्यात मागासवर्गीयबहुल असलेल्या भागात भगवान बुद्धांची मूर्ती स्थापन करण्याची प्रथा चालू झाली आहे. ‘तामिळी जनता हे हिंदु नसून ते बौद्ध आहेत. तामिळ बौद्धांचे आर्यांनी धर्मांतर केले. राज्यातील श्रीरंगम् आणि चिदंबरम् ही प्रसिद्ध मंदिरे मूळ बौद्ध विहार असून ती ब्राह्मणांनी कह्यात घेतली आहेत’, असा दुष्प्रचार मागासवर्गियांसाठी कार्यरत असलेला व्हीसीके पक्ष करत आहे. (निव्वळ ब्राह्मणद्वेषापायी तमिळी जनतेची दिशाभूल करणारा व्हीसीके पक्ष ! अशा राजकीय पक्षांवर बंदीच हवी ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

मागील काही मासांत तमिळनाडून घडलेल्या हिंदुविरोधी घटना !

  • ११ जुलै २०२१ : तिरुनेलवेली येथील मंदिरातील मूर्तीची तोडफोड करून दागिन्यांची चोरी करण्यात आली.
  • १६ जुलै २०२१ : द्रमुक सरकारने कोइम्बतूर येथील ९ मंदिरे अवैध असल्याचे सांगत ती पाडली.
  • २५ जुलै २०२१ : राणीपेठ येथील १ सहस्र ५०० वर्षे पुरातन मंदिरातील अम्मनदेवी मूर्तीचे वस्त्र काढून धर्मांधांनी त्यावर वीर्य टाकले.
  • २७ सप्टेंबर २०२१ : पेरंबेलूर जिल्ह्यातील एका गावातील मंदिरातील रथाला धर्मांधांनी आग लावली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *