Menu Close

‘स्वा. सावरकरांची बदनामी करण्याचे षड्यंत्र’ या विषयावर ‘ऑनलाइन’ विशेष संवाद !

काँग्रेसने हिंदूंचा मोठा पक्ष निर्माण केला असता,तर फाळणी टळली असती ! – उदय माहुरकर

अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयाचे सय्यद अहमद वर्ष 1883 पासून भारताचे विभाजन आणि भारतावर इस्लामची सत्ता स्थापण्याविषयी सतत वक्तव्ये करत होते. मुस्लीम लीगनेही त्यासाठी देशभरात अधिवेशन घेऊन सिद्धता चालू केली होती. ‘भारताची फाळणी होणार’ हे स्वा. सावरकरांनी 7 वर्षे आधीच जाहीररित्या सांगितले होते; मात्र काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी ते अमान्य करत त्याकडे दुर्लक्ष केले. मुस्लीम लीगने हिंसाचार चालू केल्यावर काँग्रेसने त्याला विरोध न करता मुसलमानांचे लांगूलचालन चालूच ठेवले. स्वा. सावरकरांच्या म्हणण्याप्रमाणे काँग्रेसने आणि हिंदूंनी हिंदूंचा मोठा पक्ष बनवला असता, विरोधाची फळी निर्माण केली असती, तर भारताची फाळणी नक्कीच टाळता आली असती, असे प्रतिपादन ‘वीर सावरकर : द मॅन हु कुड हॅव प्रिवेन्टेड पार्टीशन’ या पुस्तकाचे लेखक तथा भारताचे माहिती आयुक्त श्री. उदय माहुरकर यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘स्वा. सावरकरांची बदनामी करण्याचे षड्यंत्र’ या ‘ऑनलाइन विशेष संवादा’त ते बोलत होते.

श्री. माहुरकर पुढे म्हणाले की, ज्या लोकांची विचारसरणी देशाच्या विभाजनावर टिकली आहे. असे डावे आणि काँग्रेसवाले सावरकरांना बदनाम करण्याची षड्यंत्रे रचत असतात; कारण सावरकरांचे विचार कृतीत आणले, तर या देशातील हिंदु शक्ती संघटित होईल आणि या देशाचे तुकडे करणे शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांना सतत विरोध केला जात आहे. या वेळी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे अध्यक्ष श्री. रणजीत सावरकर म्हणाले की, गांधींची हत्या 30 जानेवारी या दिवशी झाली नसती, तर त्या दिवशी काँग्रेस बरखास्त होणार होती. तेव्हा काँग्रेस बरखास्त झाली असती, तर नेहरूंना सत्तेपासून लांब जावे लागले असते. तेव्हा हिंदु महासभा हा दुसरा मोठा पक्ष म्हणून पुढे आला असता; मात्र पुराव्या अभावी सावरकरांना गांधी हत्येत गोवून त्यांचे राजकीय अस्तित्व नष्ट करण्यात आले. गांधी हत्येचा खरा लाभ कोणाला झाला, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.

या वेळी ‘हिंदु जनजागृती समिती’चे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे म्हणाले की, सावरकरांनी माफी मागितली म्हणून त्यांची बदनामी करणारे नवशिके डावे लोक इतिहासाचा अभ्यास करत नाहीत. भारतात कम्युनिस्ट पक्ष स्थापन करणारे कॉ. डांगे यांनी कारागृहातून सुटका व्हावी, म्हणून ब्रिटिशांना लिहिलेल्या दया याचिकेत म्हणतात, ‘…मी ब्रिटीशांशी गद्दारी केलेली नाही आणि भविष्यात कधीही गद्दारी करणार नाही. मी आपला सेवाधारी आहे.’ खरेतर साम्यवाद्यांना याची लाज वाटली पाहिजे. सावरकरांनी केलेल्या याचिकेमुळे शेकडो भारतीय राजबंद्यांची मुक्तता झाली. बॅरिस्टरचे शिक्षण झाल्यावर ती पदवी घेण्यासाठी ‘मी ब्रिटिश शासनाशी एकनिष्ठ राहीन’ ही प्रतिज्ञेची अट अमान्य करत सावरकरांनी बॅरिस्टर पदवी नाकारली होती. यातच त्यांची देशाप्रतीची निष्ठा दिसते; मात्र अनेक काँग्रेसी नेत्यांनी बॅरिस्टरची पदवी घेतली. त्यांना काँग्रेसी जाब का विचारत नाहीत? क्रांतीकार्य शिकण्यासाठी कम्युनिस्टांचे नेते लेनीन हे 3 दिवस ‘इंडिया हाऊस’मध्ये स्वा. सावरकरांच्या आश्रयाला होते. सावरकरांचे देशकार्य पाहिल्यावर मुंबईत कम्युनिस्ट नेत्यांनी त्यांचा मोठा नागरी सत्कार केला होता, हे आजचे डावे विचारवंत का सांगत नाहीत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *