नवी देहली – कपडे, गृहसजावट आदी उत्पादनांशी संबंधित असलेल्या ‘फॅबइंडिया’ या आस्थापनाने हिंदूंच्या सणांच्या पार्श्वभूमीवर ‘जश्न-ए-रिवाज’ विज्ञापनाच्या माध्यमांतून प्रसार चालू केला होता. याला हिंदूंनी, तसेच भाजपने तीव्र विरोध केला. तसेच यावर बहिष्कार घालण्याची चेतावणी दिली. यानंतर हे विज्ञापन आस्थापनाकडून मागे घेण्यात आले. ‘फॅबइंडिया’कडून दिवाळीच्या सणाला अपमानित करण्याचा आणि त्याला ‘जश्न-ए-रिवाज’ म्हणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या म्हणाले होते, ‘दिवाळी ‘जश्न-ए-रिवाज’ नाही. हेतूपुरस्सर अपप्रकार करणार्यांना आर्थिक हानीला सामोरे जावे लागेल.’
फैब इंडिया के फेस्टिव सीजन कैंपेन पर बवाल https://t.co/gQZu6bTko2
— AajTak (@aajtak) October 18, 2021