या निवेदनामध्ये पुढे म्हटले आहे की,
१. विजयादशमीच्या दिवशी बांगलादेशात जिहाद्यांनी तेथील अल्पसंख्यांक हिंदूंवर हिंसक आक्रमण केले आहे. नवरात्रीच्या मंडपात घुसून दुर्गादेवीच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. २०० मुसलमान जिहाद्यांनी नौआखाली येथील ‘इस्कॉन’च्या आश्रमावर आक्रमण करून आश्रमातील कृष्णभक्तांची हत्या केली. राधा-कृष्ण मूर्तीची तोडफोड करून ‘भगवद्गीता’ ग्रंथ जाळला.
२. हिंदूंवरील ही आक्रमणे थांबवण्यासाठी तेथील शरियतच्या आधारे चालणारे इस्लामिक सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या हिंसक आक्रमणांमागे ‘जमात-ए-इस्लामी’ या इस्लामिक जिहादी संस्थेचा हात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंवर होत असलेल्या आघातांच्या प्रकरणी भारतानेही प्रतिघात करणे आवश्यक आहे.
३. यासाठी आपण लवकरात लवकर भारतात राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा (एन्.आर्.सी.) त्वरित लागू करावा. या कायद्याची कार्यवाही करून देशातील घुसखोर बांगलादेशी मुसलमानांना हुसकावून लावण्यात यावे.