Menu Close

बांगलादेशात हिंदूंवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा ! – नाशिक येथील हिंदुत्वनिष्ठांची मागणी

दुर्गापूजा मंडप आणि ‘इस्कॉन’ मंदिर यांवर आक्रमण करणारे धर्मांध

नाशिक – बांगलादेशात नवरात्रीमध्ये शेकडो दुर्गापूजा मंडप आणि ‘इस्कॉन’ मंदिर यांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे येथील हिंदुत्वनिष्ठांनी निवेदनाद्वारे केली आहे. येथील निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्याद्वारे पंतप्रधानांसाठी हे निवेदन पाठवण्यात आले. या वेळी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी, हिंदु जनजागृती समितीचे राहुल पाटील, विश्व हिंदू परिषदेचे कैलास देशमुख, इस्कॉनचे सारस कृष्ण प्रभू, धर्माभिमानी उदय उपासनी, धर्माभिमानी अमोल शिंदे आदी हिंदुत्वनिष्ठ, धर्माभिमानी उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *