Menu Close

इस्लामी देश इंडोनेशियामध्ये ७० सहस्र मशिदींच्या ध्वनीक्षेपकाचा आवाज न्यून !

जकार्ता (इंडोनेशिया) – जगभरात सर्वाधिक म्हणजे २१ कोटी मुसलमान लोकसंख्या असणार्‍या इंडोनेशियामध्ये ७० सहस्र मशिदींवरील ध्वनीक्षेपकांचा आवाज न्यून करण्यात आला आहे. मोठ्या आवाजामुळे लोक त्रस्त झाल्याने ‘इंडोनेशिया मशीद परिषदे’ने हा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपासून देशात ध्वनीक्षेपकाच्या मोठ्या आवाजाला विरोध चालू झाला होता. यासंदर्भात ऑनलाईन तक्रारींची संख्याही वाढली होती. ‘ध्वनीक्षेपकाच्या मोठ्या आवाजामुळे आमच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. नैराश्य, चिडचिडेपणा, निद्रानाश अशा समस्या उद्भवत आहेत’, असे लोकांचे म्हणणे होते. हे सूत्र संवेदनशील असल्याने लोक उघडपणे विरोध करत नव्हते.

१. परिषदेचे अध्यक्ष युसूफ काल्ला यांनी सांगितले की, देशातील ७ लाख ५० सहस्रांपेक्षा अधिक मशिदींपैकी बहुतांश मशिदींची ध्वनीक्षेपक यंत्रणा ठीक नाही. त्यामुळे अजानचा आवाज मोठा येतो. परिषदेने ७ सहस्र तंत्रज्ञांकडे काम सोपवून देशातील अनुमाने ७० सहस्र मशिदींच्या ध्वनीक्षेपकांचा आवाज न्यून केला आहे.

२. देशात ईशनिंदेच्या कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद आहे. अजानच्या मोठ्या आवाजाला विरोध केल्याने एका महिलेला दीड वर्षाची शिक्षा झाली आहे. जेव्हा राजधानी जकार्तामधील काही लोकांनी मोठ्या आवाजाविरोधात तक्रार केली, तेव्हा सहस्रो धर्मांधांनी त्यांच्या इमारतीलाच घेराव घातला होता. तेव्हा सैन्याला बोलवावे लागले होते.

जर्मनीच्या कोलोन शहरात मशिदींवरील ध्वनीक्षेपकाला विरोध

जर्मनीतील सर्वांत मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या कोलोनमध्ये तेथील  महापौरांनी शुक्रवारी मशिदींच्या ध्वनीक्षेपकांवरून अजान ऐकवण्याला संमती दिल्यावर त्याला देशातील कट्टर राष्ट्रनिष्ठ असलेल्या ए.एफ्.डी. (ऑल्टरनेटिव्ह फॉर डॉयशेलँड) या राजकीय पक्षाने तीव्र विरोध केला आहे. पक्षाचे उप प्रवक्ता मॅथियस बुशग्स म्हणाले की, ‘जर्मनीचे इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. या निर्णयामुळे आमचा देश ख्रिस्ती नव्हे, तर इस्लामी असल्याची प्रतिमा निर्माण होत आहे.’ कोलोनमध्ये १ लाख २० सहस्र मुसलमान रहातात. ही संख्या शहराच्या एकूण लोकसंख्येच्या १२ टक्के आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *