भरूच (गुजरात) – येथील जलाराम बाप्पा मंदिरामध्ये पूर्वी प्रत्येक गुरुवारी सायंकाळी आरती होत असे. काही वर्षांपूर्वी मंदिरासमोरील भागामध्ये शौकत अली याने घर विकत घेतले. त्याने आरतीला विरोध करण्यास प्रारंभ केला. हळूहळू या भागात २८ मुसलमानांनी घरे विकत घेतली. त्यामुळे आरतीला होणारा विरोध आणखी तीव्र झाल्याने ती बंद करावी लागली. आता हे मंदिरच विकण्याची सिद्धता चालू आहे. याविषयी मंदिराबाहेर एक फलक लावण्यात आला आहे, तसेच बहुसंख्य हिंदू वास्तव्य करत असलेले संकुल आता मुसलमानबहुल झाल्याने हिंदू तेथून पलायन करत आहेत, असे वृत्त ‘ऑप इंडिया’ वृत्तसंकेतस्थळाने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
१. सूत्रांनी सांगितले की, भरूचमधील काही भागांमध्ये वर्ष २०१९ मध्ये ‘अशांत क्षेत्र अधिनियम’ लावण्यात आले; मात्र प्रशासनातील काही लोकांच्या साहाय्याने या अधिनियमातील त्रुटींचा अपलाभ घेऊन येथील लोकसंख्येची स्थिती पालटण्यात आली आहे. आता तेथे हिंदू अल्पसंख्य झाले असून मुसलमान बहुसंख्य झाले आहेत. तेथे केवळ २० ते २५ हिंदु कुटुंबेच शिल्लक आहेत.
२. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा येथील हिंदु निवासींनी मुसलमानांनी घरे विकत घेण्याला विरोध केला, तेव्हा पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांनी निवासींवरच शांतता भंग केल्याचा आरोप करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची धमकी दिली. (असे पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी भारताचे कि पाकचे ? – संपादक दैनिक सनातन प्रभात )
[Exclusive] ‘This is Jalaram Bapa Temple, but it is for sale’: Hindus in Bharuch decide to leave homes over demography change (@nirwamehta reports) https://t.co/cqSRSjAy1D
— OpIndia.com (@OpIndia_com) October 12, 2021
३. या भागात अजूनही वास्तव्य करत असलेल्या हिंदु कुटुंबांवरील संकटाविषयी बोलतांना एका हिंदूंने सांगितले, ‘येथे एक मंदिर आहे. तेथे भजन-आरती होते. आधी ते (नवीन मुसलमान निवासी) गोंधळ घालतात आणि मंदिरावरील ध्वनीक्षेपकाच्या आवाजावर आक्षेप घेतात. जेव्हा हिंदू संकुलाच्या बाहेर असलेल्या सार्वजनिक ठिकाणी बसतात, तेव्हा हिंदूंवर अयोग्य वर्तनाचा आरोप करून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जाते. अशा पद्धतीने हिंदूंना येथे रहाणे कठीण झाले आहे. याविषयी आम्ही प्रशासनाला निवेदन दिले; पण काही उपयोग झाला नाही.’ (मुसलमानधार्जिणे प्रशासन ! संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक दैनिक सनातन प्रभात )
४. येथील निवासींनी सांगितले की, प्रारंभी १-२ मुसलमान चढ्या भावाने हिंदूंची संपत्ती खरेदी करतात. या जाळ्यात अन्य हिंदू अलगद अडकतात आणि त्यांची घरे विकतात. जेव्हा मुसलमानांची लोकसंख्या वाढते, तेव्हा उरलेल्या हिंदूंना त्यांची संपत्ती अतिशय अल्प भावात विकावी लागते.
‘अशांत क्षेत्र’ अधिनियम काय आहे ?जी क्षेत्रे लोकसंख्यात्मक परिवर्तनासाठी अतीसंवेदनशील आहेत, अशा काही क्षेत्रांमध्ये धार्मिक सद्भाव आणि शांतता कायम ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन ‘अशांत क्षेत्र’ घोषित करू शकते. अशा वेळी या क्षेत्रातील अचल (घर, प्लॉट) संपत्तीच्या हस्तांतरणासाठी एक विस्तृत प्रक्रियेची आवश्यकता असते. विक्रेत्याला त्याच्या आवेदनामध्ये ‘तो ही संपत्ती त्याच्या इच्छेने विकत आहे’, असा उल्लेख करावा लागतो. असे आवेदन आल्यानंतर त्याप्रमाणे जिल्हाधिकारी आणि पोलीस या प्रकरणी चौकशी करतात. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर आणि जिल्हाधिकार्यांची संमती असल्यावरच संपत्तीचे हस्तांतरण होते. या अधिनियमाच्या माध्यमातून सरकार राज्याच्या संवेदनशील भागांतील समुदायांचे ध्रुवीकरण थोपवण्याचा प्रयत्न करत आहे. |