या ‘फोरम’ने अहवालात म्हटले आहे की, काही धर्मियांकडून वनवासी पाड्यांमधील गोरगरिबांचे बलपूर्वक धर्मांतर केले जाते. धर्मांतर करणार्यांकडून धर्मांतराची प्रक्रिया पार पाडतांना वनवासी पाड्यांतील अनेक गोरगरिबांना स्वाक्षर्या करण्यासाठी धमकावले जाते. अशांच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवल्यास याप्रकरणी दादही मिळत नाही; कारण अनेकदा पोलीस कर्मचारीच विविध कार्यालयीन प्रक्रियेच्या नावाखाली या ना त्या मार्गाने या गोरगरिबांच्या स्वाक्षर्या धर्मांतर करणार्यांना उपलब्ध करून देतात, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आला.