गुरुग्राम (हरियाणा) येथे सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करतांना जमावाने ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याचे प्रकरण
|
नवी देहली – हरियाणातील गुरुग्राम येथे सार्वजनिक ठिकाणी मुसलमानांकडून शुक्रवारच्या दिवशी अवैधरित्या नमाजपठण केले जात असतांना जमावाकडून ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला. त्यावर ट्वीट करतांना अभिनेत्री स्वरा भास्कर म्हणाल्या, ‘मला हिंदु असल्याची लाज वाटत आहे.’ (अशा हिंदुद्वेषी अभिनेत्रींच्या चित्रपटांवर आता हिंदूंनी बहिष्कार घालून त्यांना हिंदुऐक्याची चुणूक दाखवून द्यावी ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) या ट्वीट नंतर त्यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका केली गेली. ‘तुम्ही हिंदु असल्याचीच आम्हाला लाज वाटते.’ ‘तुम्ही हिंदु धर्म सोडत का नाही ?’, अशा शब्दांत त्यांच्यावर टीका करण्यात आली.
#Correction | ‘When I see some…’: Actress #SwaraBhasker defends her ‘as a Hindu, I’m ashamed’ remark @ReallySwarahttps://t.co/9iGfBszUGq
— Jagran English (@JagranEnglish) October 23, 2021