हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचे मुंबई येथील कार्यक्रम रहित करावेत !
Share On :
‘सॅफरॉन थिंक टँक’ संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी !
जानेवारी २०२१ मध्ये इंदौर (मध्यप्रदेश) येथील ‘मुनरो कॅफे’मधील एका कार्यक्रमात मुनव्वर फारूकी यांनी हिंदूंच्या देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्या केल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली होती. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन संमत केल्यामुळे फेब्रुवारी २०२१ मध्ये त्याची इंदूर येथील कारागृहातून सुटका झाली. जामीनावर त्याची सुटका झाली असली, तरी न्यायालयाने मुनव्वर यांच्यावरील गुन्हे अद्यापही मागे घेतलेले नाहीत. असे असतांना त्याच्या कार्यक्रमांना कुठल्या आधारावर अनुमती दिली जाते ? असा प्रश्न ‘सॅफरॉन थिंक टँक’द्वारे उपस्थित करण्यात आला आहे.
प्रभु श्रीरामाचा अवमान करणार्याचा कार्यक्रम आयोजित करणार्यांना लाज वाटली पाहिजे ! – साध्वी सरस्वतीजी
साध्वी सरस्वतीजी प्रभु श्रीरामाचा अवमान करणार्या व्यक्तीचे कार्यक्रम आयोजित करणार्या आयोजकांना लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्र आणि केंद्र सरकार यांनी हिंदु धर्माचा अवमान करणार्यांना ‘देशद्रोही’ म्हणून संबोधले पाहिजे. त्यांना कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम करण्यापासून आजन्म बंदी घातली पाहिजे, असे सामाजिक माध्यमांद्वारे आवाहन करून साध्वी सरस्वतीजी यांनी मुनव्वर फारूकी यांचा मुंबई येथील कार्यक्रम रहित करण्याच्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे.