‘सेक्युलर’ भारतात धर्माधारित ‘हलाल अर्थव्यवस्था’ कशासाठी हवी ?
‘हलाल’ या मूळ अरबी शब्दाचा अर्थ इस्लामनुसार वैध आहे. मूलतः मांसाच्या संदर्भातील ‘हलाल’ची मागणी आता शाकाहारी खाद्यपदार्थांसह सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुग्णालये, गृहसंस्था अशा अनेक गोष्टींत केली जात आहे. त्यासाठी हलाल इंडिया, जमियत उलेमा-ए-हिंद सारख्या इस्लामी संस्थांना शुल्क देऊन त्यांच्याकडून ‘हलाल प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक केले गेले आहे. सेक्युलर भारतात सरकारच्या ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ म्हणजे (FSSAI) कडून प्रमाणपत्र घेतल्यावर हे खाजगी इस्लामी प्रमाणपत्र घेण्याची सक्ती का ? भारतात अल्पसंख्य म्हणवणार्या मुसलमानांची लोकसंख्या केवळ 15 ते 17 टक्के असतांना उर्वरित बहुसंख्य हिंदू, तसेच अन्यधर्मीय यांच्यावर ‘हलाल’ का लादले जात आहे ? त्यातही मॅकडोनाल्ड आणि डॉमिनोज यांसारख्या विदेशी संस्था भारतात सगळ्याच ग्राहकांना ‘हलाल’ खाऊ घालत आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘हलाल प्रमाणिकरणा’द्वारे मिळणारे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न शासनाला न मिळता काही इस्लामी संघटनांना मिळत आहे. हे प्रमाणपत्र देणार्या संघटनांपैकी काही संघटना आतंकवादी कारवायांमध्ये अडकलेल्या धर्मांधांना सोडवण्यासाठी न्यायालयीन साहाय्य करत आहेत. निधर्मी भारतात अशी ‘धर्माधारित समांतर अर्थव्यवस्था’ निर्माण केली जाणे, हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर असून शासनाने ‘हलाल प्रमाणिकरण’ पद्धत तात्काळ बंद करावी, या मागणीसह हिंदूंनी यंदा दिवाळीच्या काळात ‘हलालमुक्त दिवाळी’ या अभियानात सहभागी होऊन ‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर बहिष्कार घालावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले आहे. ते पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सत्यविजय नाईक हेही उपस्थित होते.
The Halal Economy is a ploy to destroy India’s economic, socio-cultural and religious backbone. So pledge to celebrate a sattvik Diwali ! Pledge for a #HalalFreeDiwali pic.twitter.com/38JGcjw8mw
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) October 23, 2021
सेक्युलर भारत में धर्माधारित ‘हलाल अर्थव्यवस्था’ की क्या आवश्यकता ?#Halal_Free_Diwali अभियान में सहभागी हो !- हिन्दू जनजागृति समिति
प्रशासन Halal Certification पद्धति तुरंत बंद करें, इस मांग के साथ हिन्दू ‘हलाल प्रमाणित’ उत्पादनों का बहिष्कार करें!@AmarUjalaNews @JagranNews pic.twitter.com/sNCw8q5TcI
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) October 27, 2021
सर्वांत धक्कादायक म्हणजे आजही सेक्युलर भारतात ‘भारतीय रेल्वे’, ‘पर्यटन महामंडळ’ यांसारख्या सरकारी आस्थापनांतही ‘हलाल प्रमाणित’ पदार्थच दिले जात आहेत. शुद्ध शाकाहारी नमकीन पासून ते सुकामेवा, मिठाई, चॉकलेट, धान्य, तेल, यांसह साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, काजळ, लिपस्टिक आदी सौंदर्यप्रसाधनेही ‘हलाल प्रमाणित’ होऊ लागली आहेत. इंग्लंडमधील विद्वान निकोलस तालेब यांनी याला ‘मायनॉरिटी डिक्टेटरशीप’ म्हटले आहे. हे असेच चालू राहिले, तर ही भारताची ‘इस्लामीकरणा’कडे वाटचाल होत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
भारत सरकारचे ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI) असतांना ‘हलाल प्रमाणपत्र’ देणार्या इस्लामी संस्थांची भारतात आवश्यकताच काय आहे ? या हलाल प्रमाणपत्रासाठी प्रथम 21,500 रुपये आणि प्रतिवर्षी नूतनीकरणासाठी 15,000 रुपये घेतले जातात. यातून निर्माण होत असलेली हलालची समांतर अर्थव्यवस्था मोडून काढणे अत्यावश्यक आहे, त्यासाठीच या वर्षी हिंदूंनी दिवाळीच्या वस्तू खरेदी करतांना ग्राहकाचा हक्क वापरून ‘हलाल प्रमाणित’ उत्पादने, मॅकडोनाल्ड आणि डॉमिनोजचे खाद्यपदार्थ यांच्यावर बहिष्कार घालावा आणि ‘हलालमुक्त दिवाळी’ या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे. समिती आंदोलने, निवेदन देणे, सोशल मिडीया आदी माध्यमांतून जनजागृती करत आहे.
यंदाची दिवाळी ‘हलाल मुक्त दिवाळी’ साजरी करा ! – श्री. रमेश शिंदे
‘सीएट टायर्स’च्या जाहिरातीमध्ये ‘रस्ते हे फटाके फोडण्यासाठी नसतात’ असा सल्ला आमीर खान हिंदूंना देतो; मात्र ‘रस्ते नमाज पडण्यासाठीही नसतात’ याविषयी तो काही बोलत नाही. ‘फॅब इंडिया’च्या जाहिरातीतून दिवाळीला ‘जश्न-ए-रिवाज’ असे संबोधले आहे. हिंदूंच्या परंपरांना ‘इस्लाम’कडे नेणे, तसेच त्यानंतर तिथे ‘हलाल’ची व्यवस्था निर्माण करणे आणि ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या आधारावर इस्लामी बँकेला प्रोत्साहन देऊन मजबूत करणे चालू आहे. याविषयाकडे हिंदूंनी जागरूकतेने पाहायला हवे. भारतात मोठ्या प्रमाणात ‘ऑनलाईन’ व्यापारातून कोट्यवधींचा व्यापार होतो. यामध्ये दिवाळीसारख्या सणांत हिंदु ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यामुळे आम्ही ‘हलाल मुक्त दिवाली’ ही मोहिम राबवत असून या मोहिमेत संपूर्ण हिंदु समाजाने सहभागी व्हावे. हिंदूंनी या दिवाळीला ‘हलाल’ प्रमाणित उत्पादने आणि हिंदु परंपरांचे इस्लामीकरण करणार्या आस्थापनांची उत्पादने न घेता यंदाची दिवाळी ही ‘हलाल मुक्त दिवाळी’ साजरी करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘या वर्षी साजरी करा : हलाल मुक्त दिवाळी !’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.
श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले की, हिंदु समाजात ‘हलाल’विषयी अजूनही अज्ञान आहे. भारतात FSSAI आणि FDI या प्रमाणपत्र देणार्या भारत सरकारच्या संस्था असतांना इस्लामी संस्थांकडून ‘हलाल’चे प्रमाणपत्र घेण्याची सक्ती का ? ‘हलाल’ आता केवळ मांसाहारी पदार्थापुरती मर्यादित राहिले नसून जीवनावश्यक वस्तू, खाद्यपदार्थ, मिठाई, शीतपेये, रुग्णालये, निवासी संकुले इथपर्यंत पसरले आहे. ‘हलाल’चे हे सर्व धन इस्लामिक बँकांकडे जात आहे. ‘हलाल व्यवस्था’ ही अल्पसंख्याकांची हुकूमशाही आहे. जिथे हुकूमशाही आहे, तिथे आतंकवाद आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
इस वर्ष ‘हलाल मुक्त दीपावली’ मनाएं ! – @Ramesh_hjs
दीपावली जैसे त्योहार में हिन्दू ग्राहक बडी मात्रा में खरीदारी करते हैं । इस दीपावली को ‘हलाल’ प्रमाणित उत्पादन न लेकर हिन्दू इस वर्ष #Halal_Free_Diwali मनाएं !@aajtak @ZeeNews @JagranNews @DainikBhaskar @AmarUjalaNews pic.twitter.com/Jf8pPaMyZP
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) October 25, 2021
The Halal Economy is a ploy to destroy India’s economic, socio-cultural and religious backbone. So pledge to celebrate a sattvik Diwali ! Pledge for a #HalalFreeDiwali pic.twitter.com/38JGcjw8mw
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) October 23, 2021
विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. विनोद बंसल म्हणाले की, ‘जमात-ए-इस्लामी’सह साधारणत: 8 ते 10 कट्टरतावादी इस्लामी संघटनांना ‘हलाल’ प्रमाणपत्र देण्याचा अधिकार दिला आहे. ‘हलाल’च्या पैशांचा वापर आतंकवादी कारवायांसाठी वापरला जातो. हे भारतातीलच नव्हे, तर जगभरातील घटनांतून समोर आले आहे. ‘हलाल सर्टिफिकेट’ देणार्या सर्व आस्थापनांवर हिंदु बांधवांनी बहिष्कार करायला हवा आणि अशी आस्थापने, संस्था यांचे खरे स्वरूप उघड करायला हवे. हिंदूंनी स्वत:हून यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता गौरव गोयल म्हणाले की, ‘हलाल’कडे जाणारा पैसा कशासाठी वापरला जातो, याविषयी संभ्रमावस्था आहे. किंबहुना चुकीच्या गोष्टींसाठी याचा वापर केला जात असल्याचे लेख प्रसारमाध्यमांतून वाचनात आले आहेत. ‘हलाल’च्या समांतर अर्थव्यवस्थेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे हिंदूंनी फक्त दिवाळीतच नव्हे, तर संपूर्ण वर्षभर ‘हलाल’पासून स्वत:ला वाचविणे आवश्यक आहे. आम्ही अधिवक्ता म्हणून ‘हलाल’विरोधात न्यायालयीन मार्गाने लढा देऊ, असेही अधिवक्ता गोयल म्हणाले.