Menu Close

उत्तरप्रदेशातील ‘फैजाबाद रेल्वे जंक्शन’चे नाव ‘अयोध्या कँट’ होणार

ज्या प्रमाणात उत्तरप्रदेश सरकार राज्यातील मोगलकालीन नावे पालटत आहे, त्या प्रमाणात अन्य कुठल्याही राज्यात असे होतांना दिसत नाही. केंद्र सरकारने आता  देशभरातील मोगल आणि ब्रिटीश कालीन नावे पालटण्याचा निर्णय घेतला पाहिजे ! – संपादक  दैनिक सनातन प्रभात

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश सरकारने ‘फैजाबाद रेल्वे जंक्शन’चे नाव पालटून ‘अयोध्या कँट’ करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडून याविषयीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या गेल्या आठवड्यात झालेल्या राज्याच्या दौर्‍यापूर्वी अयोध्येला ‘फैजाबाद’ असे संबोधणारी भित्तीपत्रके  जिल्हाभर लावण्यात आली होती. त्याला विरोध करण्यात आला होता.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *