कुडाळ आणि वेंगुर्ले येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रशासनाला निवेदन
|
सिंधुदुर्ग – बांगलादेशमध्ये नवरात्रीच्या काळात अनेक ठिकाणी धर्मांधांनी ‘कुराणचा अवमान केला’, अशी अफवा पसरवून शेकडो दुर्गापूजा मंडपांवर आणि शेकडो हिंदूंवर आक्रमण केले. बांगलादेश हा मुसलमानबहुल तथा इस्लामी देश असल्यामुळे तेथील अल्पसंख्यांक हिंदूंची संपत्ती, भूमी आणि महिला यांची अक्षरश: लूट केली जात आहे. तेथील सरकार ‘हिंदूंचे रक्षण करू’ असे सांगत असले, तरी तेथील धर्मांधांना ते रोखू शकत नाहीत. त्यामुळे बांगलादेशात हिंदूंवर आक्रमण करून त्यांची हत्या करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुडाळ आणि वेंगुर्ले येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. याविषयीचे निवेदन कुडाळ आणि वेंगुर्ले येथील तहसीलदारांना देण्यात आले.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निवेदनाद्वारे पंतप्रधान मोदी यांच्याकडे पुढील मागण्या केल्या आहेत.
१. जगभरात भारत हा एकमेव हिंदूंचा देश आहे. या नात्याने जगभरातील हिंदु समाजाचे नैतिक दायित्व भारत सरकारचे आहे. या दृष्टीने बांगलादेशातील हिंदु समाजाला सुरक्षा पुरवावी, यासाठी भारत सरकारने तात्काळ बांगलादेशाच्या पंतप्रधानांशी थेट संवाद साधावा.
२. हिंदूंवर हिंसक आक्रमणे करणार्या, मूर्तींचे भंजन करणार्या, दुर्गापूजा मंडप उद्ध्वस्त करणार्या धर्मांधांना शोधून काढून त्यांच्यावर आणि त्यांच्या सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
३. भारत सरकारने पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचारांविषयी ‘संयुक्त राष्ट्रां’त सूत्र उपस्थित करून या दोन्ही देशांवर दबाव निर्माण करावा.
४. हिंदूंना सुरक्षा पुरवली नाही किंवा असेच चालू राहिले, तर बांगलादेशाशी सर्व प्रकारचे संबंध संपुष्टात येतील, तसेच त्यांच्यावर निर्बंध लादण्यात येतील, अशी चेतावणी बांगलादेशाच्या सरकारला द्यावी.
कुडाळ
वेंगुर्ले
वेंगुर्ले तहसील कार्यालयात हिंदू बांधव एकत्र आल्यानंतर अधिवक्त्या सुषमा खानोलकर यांनी एकत्र येण्यामागची भूमिका मांडली.