Menu Close

केरळमध्ये ‘हलाल’मुक्त रेस्टॉरंट उघडणार्‍या महिलेला अज्ञातांकडून मारहाण

रेस्टॉरंटची दुसरी शाखा उघडण्यास धर्मांधांचा विरोध

केरळमध्ये माकपचे सरकार असतांना एका महिला व्यवसायिकाला मारहाण होणे लज्जास्पद आहे ! आता याविषयी मानवाधिकारवाले आणि महिला संघटनावाले गप्प का आहेत ? – संपादक : दैनिक सनातन प्रभात 

‘हलाल’मुक्त रेस्टॉरंट उघडणार्‍या तुशारा अजित यांना मारहाण

एर्नाकुलम् (केरळ) – येथे ‘हलाल’ पदार्थ नसेलेले ‘नंदूज किचन’ नावाचे रेस्टॉरंट उघडणार्‍या तुशारा अजित या महिलेवर २५ ऑक्टोबर या दिवशी आक्रमण करून मारहाण करण्यात आली. तुशारा यांनी यावर्षी जानेवारी मासामध्येच हे रेस्टॉरंट उघडले होते. या रेस्टॉरंटमध्ये केवळ हलाल नसलेलेच पदार्थ मिळतात. त्यांनी बाहेर फलक लावून त्यात लिहिले आहे, ‘हलाल भोजन येथे प्रतिबंधित आहे.’ यामुळे अनेक मुसलमानांनी त्यांच्या रेस्टॉरंटवर आक्षेप घेतला होता. तुशारा या रेस्टॉरंटची दुसरी शाखा उघडणार होत्या. त्यामुळे त्यांना धर्मांधांकडून धमक्या मिळू लागल्या होत्या.

या आक्रमणाचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन् यांनी ट्वीट करून निषेध केला आहे. त्यांनी म्हटले की, ही घटना तालिबानी कृती आहे. मी केरळच्या लोकांना ‘हलाल’वर बहिष्कार घालण्याचे आवाहन करतो.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *