थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ राज्यातील विविध हिंदु आश्रम आणि पुजारी, स्वामी आदींनी हिंदूंच्या संदर्भातील घटनांविषयी लढण्यासाठी एकत्र येऊन एका मंचाची स्थापना केली आहे. याचे नाव ‘केरळ धर्माचार्य सभी’ (के.डी.एस्.) असे ठेवण्यात आले आहे. या संघटनेच्या माध्यमातून हिंदूंच्या समोर येणार्या आव्हानांविषयी अधिकृत भूमिका मांडण्यात येणार आहे. या संघटनेकडून २३ सदस्यीय कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये पुजारी सहभागी असणार आहेत. राज्यातील कोच्ची शहरात याविषयी आयोजित बैठकीत प्रमुख आश्रम आणि धार्मिक संस्था यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.