पाकने भारताच्या विरोधातील क्रिकेटचा सामना जिंकल्याचे प्रकरण
अशांना नोकरीवरून काढून सोडून देऊ नये, तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
उदयपूर (राजस्थान) – भारत आणि पाक यांच्यातील टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामना पाकने जिंकल्यावर येथील नीरजा मोदी शाळेतील शिक्षिका नफीसा अटारी यांनी त्यांचा ‘व्हॉट्स अॅप स्टेटस’ ठेवतांना ‘जिंकलो आपण जिंकलो’ असे लिहिले होते. याविषयी एका व्यक्तीने त्यांना ‘तुम्ही पाकिस्तानचे समर्थन करता का ?’ असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी ‘हो’ म्हणून उत्तर दिले. ही माहिती शाळेला मिळाल्यावर शाळेने नफीसा यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. त्यांचा हा व्हॉट्स अॅप स्टेटस सर्वत्र प्रसारित झाल्याने भारतीय नागरिकांकडून त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
महिला टीचर ने वॉट्सऐप पर लगाया पाकिस्तान की जीत का स्टेटस, स्कूल ने किया ऐसा हाल #news #dailyhunt https://t.co/2r6MHIGPRQ
— Dailyhunt Hindi (@DH_Hindi) October 26, 2021