-
६ धर्मांध पसार !
-
८ लाख ५० सहस्र रुपयांचा ऐवज जप्त
|
सिल्लोड (जिल्हा संभाजीनगर) – येथील एका अवैध पशूवधगृहावर धाड टाकून पोलिसांनी गोवंशियांचे मांस, १ चारचाकी वाहन, असा एकूण ८ लाख ५० सहस्र रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई शहरातील ईदगाह परिसरातील अब्दुलशानगर येथे करण्यात आली. या कारवाईची चाहूल लागताच आरोपी पळून गेले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. (पोलिसांच्या धाडीची माहिती आरोपींना कशी मिळते ? याचीही चौकशी केली पाहिजे. – संपादक दैनिक सनातन प्रभात) शेख गफूर बिस्मिल्ला, महंमद ताहेर अजीज कुरेशी, जुनेद ताहेर कुरेशी, साबेर अजीज कुरेशी, तय्याब हनिफ कुरेशी, मुजीब हनिफ कुरेशी अशी गुन्हा नोंद करण्यात आलेल्या ६ आरोपींची नावे आहेत.
शहरातील अब्दुलशानगर येथे एका चारचाकी वाहनात गोवंशियांचे मांस भरले जात असल्याची माहिती पोलिसांनी खबर्याकडून मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांसह त्यांच्या पथकातील पोलिसांनी तेथे धाड टाकली. त्या वेळी चारचाकी वाहनात गोवंशियांचे मांस भरलेले आढळून आले.
जनावरे चोरीची असल्याचा संशय !
या प्रकरणातील आरोपी हे शेतकर्यांची जनावरे चोरून आणत आहेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तालुक्यात जनावरे चोरीच्या घटना चालू आहेत. चोरलेल्या जनावरांची तात्काळ हत्या करून आरोपी पुरावे नष्ट करत आहेत. धाड टाकली त्या ठिकाणी २३ जनावरांचे छाटलेली मुंडकी आढळून आली. तालुक्यात अशी अवैध पशूवधगृहे अनेक ठिकाणी चालू आहेत. (जनावरांना चोरण्याच्या अनेक घटना घडूनही पोलिसांनी या घटनेतील गुन्हेगारांचा शोध का लावला नाही ? एवढ्या घटना घडेपर्यंत पोलीस झोपले होते का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)