Menu Close

‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून निर्माण झालेल्या समांतर अर्थव्यवस्थेला संघटित होऊन विरोध करा ! – मनोज खाडये, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

उपस्थितांचे ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या संदर्भात प्रबोधन करतांना श्री. मनोज खाडये

मिरज – मुसलमान प्रत्येक उत्पादक आणि आस्थापन यांच्याकडे हेतूपुरस्सर मागणी करून ‘हलाल प्रमाणपत्र’ घेण्यास भाग पाडत आहेत. ‘हलाल प्रमाणपत्र’ अन्न व औषध प्रशासनाकडून नाही, तर ‘जमियत उलेमा ए हिंद’ या संघटनेकडून घ्यावे लागते. हिंदूंचा व्यापार आणि व्यवस्था यांत हस्तक्षेप करून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे हे जागतिक षड्यंत्र आहे. त्यामुळे ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून निर्माण झालेल्या समांतर अर्थव्यवस्थेला संघटित होऊन विरोध करूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘हलाल प्रमाणपत्रा’चे सत्य, या विषयावर बोलत होते.

या वेळी साप्ताहिक ‘दर्पणकार’चे संपादक श्री. सूर्यकांत कुकडे, दैनिक ‘प्रतिध्वनी’चे संपादकीय विभागातील श्री. सुभाष कपूर, दैनिक ‘हॅलो प्रभात’चे प्रतिनिधी तांबोळकर, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. विठ्ठल मुगळखोड, सर्वश्री संदीप माळी, दिगंबर कोरे, ओंकार गवळी, सचिन भोसले, जयदीप सदामते उपस्थित होते.

हाच विषय श्री. मनोज खाडये यांनी व्यापारी आणि उद्योजक यांच्या बैठकीतही सांगितला. या बैठकीसाठी शिवसेना व्यापारी सेनेचे श्री. पंडिततात्या कराडे, उद्योजक श्री. मंदार ताम्हणकर आणि श्री. वसंतकुमार शेट्टी, सनदी लेखापाल श्री. लेले, बजरंग दलाचे तालुका संघटक श्री. आकाश जाधव, ‘डिजिटल प्रिंटींग’चे उद्योजक श्री. रवी शिंदे उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. उद्योजक श्री. दिगंबर कोरे आणि श्री. रवी शिंदे यांनी ‘सहकारी व्यावसायिक आणि व्यापारी मित्र मंडळासाठी बैठक आयोजित करू’, असे सांगितले.

२. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. विठ्ठल मुगळखोड यांनी ‘शासनाशी पत्रव्यवहार करून शासनाला या संदर्भात कृती करायला भाग पाडू’, असे सांगितले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *